आजी-माजी सैनिक, पोलीस, विधवा माता यांनी उत्तूरला उभारले प्रवेशद्वार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:11+5:302021-04-07T04:25:11+5:30

१५ ऑगस्टला आजी-माजी सैनिक, पोलिस, विधवा माता यांच्या सहकार्यातून आजरा रोडकडे प्रवेशद्वार उभा करण्याचा निर्णय घेऊन कामास सुरुवात करण्यात ...

Grandparents, ex-soldiers, police, widowed mothers built the entrance to the north! | आजी-माजी सैनिक, पोलीस, विधवा माता यांनी उत्तूरला उभारले प्रवेशद्वार !

आजी-माजी सैनिक, पोलीस, विधवा माता यांनी उत्तूरला उभारले प्रवेशद्वार !

Next

१५ ऑगस्टला आजी-माजी सैनिक, पोलिस, विधवा माता यांच्या सहकार्यातून आजरा रोडकडे प्रवेशद्वार उभा करण्याचा निर्णय घेऊन कामास सुरुवात करण्यात आली.

सैन्य, पोलीस यामधील बढतीप्रमाणे स्वेच्छेने वर्गणी काढण्यात आली. त्यानुसार १ सप्टेंबरपासून कामास सुरुवात करून पूर्ण करण्यात आले. द्वारपाल चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा झेंडे-पाटील, सुरेश देसाई, गंगाधर पाकले, सुरेंद्र धुरे, दत्तात्रय देसाई, तानाजी उत्तूरकर, मारुती पाटील आदींसह आजी-माजी सैनिक, पोलीस, विधवा माता यांचे सहकार्य लाभले.

---------------------------

*

१३० जणांचा सहभाग ७

सैन्य, पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर सैन्य, पोलीस दलाची आठवण राहावी व नव्या पिढीस सैन्य व पोलीस दलात काम करण्यात चैतन्य मिळावे या उद्देशाने गावातील १३० जणांनी सहभाग घेऊन ७ लाख रुपये खर्च करून देखणे प्रवेशद्वार उभा केले आहे. विधवा मातांनी प्रत्येकी ५ हजार रुपये दिले आहेत. ग्रामपंचायतीने इतर सुविधा पुरवल्या आहेत.

----------------------

* कोरोनामुळे आनंदावर विरजण

२१ एप्रिलला प्रवेशद्वाराचे दिमाखात उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे आनंदावर विरजण पडले आहे. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईने प्रवेशद्वार खुलून दिसत आहे.

--------------------------

* फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथील आजी-माजी सैनिक, पोलिसांच्या देणगीतून साकारलेले प्रवेशद्वार. (रवींद्र येसादे)

क्रमाक : ०६०४२०२१-गड-०६

Web Title: Grandparents, ex-soldiers, police, widowed mothers built the entrance to the north!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.