ग्रेनाईट संस्थेचा अध्यक्ष तुळशीदास कांबळेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:06+5:302021-03-13T04:43:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : इचलकरंजीतील न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रेनाईट औद्योगिक सहकारी संस्थेतील ३ कोटी २५ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी ...

Granite Association President Tulshidas Kamble arrested | ग्रेनाईट संस्थेचा अध्यक्ष तुळशीदास कांबळेला अटक

ग्रेनाईट संस्थेचा अध्यक्ष तुळशीदास कांबळेला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : इचलकरंजीतील न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रेनाईट औद्योगिक सहकारी संस्थेतील ३ कोटी २५ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संस्था अध्यक्षाला अटक झाली. तुळशीदास अरविंद देसाई-कांबळे (रा. रुई, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून प्रकल्प उभारणीला अर्थ साहाय्य दिले जाते. त्यातून इचलकरंजी येथे २०१० साली न्यू महाराष्ट्र औद्योगिक सहकारी संस्थातर्फे ग्रेनाईट उत्पादनाचे युनिट सुरू करण्यात आले होते. त्याचा अध्यक्ष म्हणून तुळशीदास देसाई-कांबळे हा काम पाहत होता. सन २०१० ते २०१७ या कालावधीतील संस्थेचे लेखापरीक्षण उपलेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी पूर्ण केले. यात संस्थेत ३ कोटी २५ लाख ६५८ रुपयांचा अपहार करून संस्थेसह शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार १९ सप्टेंबर २०१९ ला या संबंधीचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर तो फरार झाला होता. याप्रकरणी तीन संशयितांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी संशयित कुमार कांबळे यास २ फेब्रुवारी २०२१ ला अटक झाली होती. त्यानंतर बुधवारी (दि.१०) संशयित देसाई-कांबळे कोल्हापुरातील दाभोळकर काॅर्नर परिसरात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक पद्मा कदम यांना मिळाली. पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, दिलीप कारंडे, दिनेश उंडाळे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्यास गुरुवारी न्यायालयात हजर केले असता शनिवार (दि.१३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

फोटो : ११०३२०२१-कोल-तुळशीदास देसाई-कांबळे (आरोपी)

Web Title: Granite Association President Tulshidas Kamble arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.