नगरपंचायतचा दर्जा द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार; राधानगरीत सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 01:29 PM2022-10-21T13:29:57+5:302022-10-21T13:30:26+5:30
येत्या पंधरा दिवसांत राधानगरी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाकडून प्रशासक नेमणूक ग्रामपंचायतची निवडणूक लागू शकते
राधानगरी : राधानगरी ग्रामपंचायतीला नगरपंचायत दर्जा न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार, असा निर्णय येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. सरपंच कविता शेट्टी यांच्या आवाहनानुसार या बैठकीचे आयोजन केले होते.
राधानगरी येथील शिष्टमंडळाने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने प्रस्ताव सादर करा अशी सूचना दिली होती. येत्या पंधरा दिवसांत राधानगरी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाकडून प्रशासक नेमणूक ग्रामपंचायतची निवडणूक लागू शकते. असे झाल्यास नगरपंचायत होण्यासाठी अडथळे निर्माण होतील. यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली. यावेळी राधानगरी ग्रामपंचायतीला नगरपंचायत दर्जा न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेतला.
यावेळी राधानगरी व्यापारी संघटना अध्यक्ष सतीश फणसे, टेलर संघटना राजेंद्र कांबळे, भाजप तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, दीपक शिरगांवकर, महेश निल्ले, महेश मोरये, दीपक शेट्टी, अभिजित हुपरीकर, सुरेश बचाटे, अरविंद पोवार, संदीप चौगले, सुहास निबाळकर उपस्थित होते.