विद्यापीठ परिसराचे दिनदर्शिकेतून चित्रमय दर्शन
By admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:37+5:302016-01-02T08:34:37+5:30
कुलगुरूंनी केले प्रकाशन : विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच दिनदर्शिका
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात यावर्षी पहिल्यांदाच दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. त्यातून विद्यापीठ परिसराचे चित्रमय दर्शन घडणार आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी दिनदर्शिका आणि सन २०१६ च्या दैनंदिनीचे प्रकाशन झाले.
कार्यक्रमात या दैनंदिनीच्या निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असणारे छायाचित्रकार शिरीष गवळी, जनसंपर्क कक्षाचे सेवक राघवेंद्र येसणे व आर्टिस्ट विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते. दरम्यान, या दिनदर्शिकेत विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत, दूर शिक्षण केंद्र, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय, स्कूल आॅफ नॅनो सायन्स व तंत्रज्ञान, परीक्षा भवन, तंत्रज्ञान विभाग यांच्या इमारतींसह छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार, वि. स. खांडेकर यांच्या पुतळ्यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या मुद्रणालयातच छपाई केली आहे. दिनदशिर्केच्या प्रथम पृष्ठावर कुलगुरू डॉ. शिंदे यांचा शुभसंदेश असून दर महिन्यात विद्यापीठाचे वैशिष्ट्य असणाऱ्या ‘नो व्हेईकल डे’सह विद्यापीठाच्या सर्व सार्वजनिक सुट्ट्यांची माहिती वेगळ्या रंगसंगतीद्वारे दर्शविली आहे. (प्रतिनिधी)