गवत फुला रे गवत फुला, शिवाजी विद्यापीठात फुलला कवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:04 PM2020-09-03T17:04:04+5:302020-09-03T17:05:59+5:30

शिवाजी विद्यापीठात कवला किंवा कवळा (विज्ञानातील नाव : स्मिथिया हिऱ्सुता) या आकर्षक गवत फुलाची वनस्पती फुलली आहे. ही फुले कासच्या पठारावर फुलणाऱ्या फुलांची आठवण करून देत आहेत.

Grass Flower Ray Grass Flower, Flower Kavala at Shivaji University | गवत फुला रे गवत फुला, शिवाजी विद्यापीठात फुलला कवला

शिवाजी विद्यापीठात कवला किंवा कवळा (विज्ञानातील नाव : स्मिथिया हिऱ्सुता) या आकर्षक गवत फुलाची वनस्पती फुलली आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देगवत फुला रे गवत फुलाशिवाजी विद्यापीठात फुलला कवला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कवला किंवा कवळा (विज्ञानातील नाव : स्मिथिया हिऱ्सुता) या आकर्षक गवत फुलाची वनस्पती फुलली आहे. ही फुले कासच्या पठारावर फुलणाऱ्या फुलांची आठवण करून देत आहेत.

संशोधक सर जेम्स एडवर्ड स्मिथ यांच्या नावावरून या गवत फुलाला ह्यस्मिथियाह्ण हे नाव देण्यात आले आहे. या कवलाच्या खोडावर केसासारखी रचना दिसते, म्हणून पुढे हिऱ्सुता जोडले गेले. हे झाड हळू वाढते. ते साधारण १५ ते ९० सेंटीमीटरपर्यंत वाढते.

पानथळ जागेतील गवतात मस्त वाढणारी आणि फुलणारी ही वनस्पती पश्चिम घाटातील नामशेष होत जाणाऱ्या वनस्पतींच्या यादीत ही वनस्पती आहे. काही भागांत याच्या पानांची भाजी खात असल्याचा उल्लेख आढळला. जमीन कसदार बनवण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते. ऊन कलायला लागले की कवलाची फुले आणि पाने मिटू लागतात. साधारण लाजाळूसारखी तीन ते चार पर्णिकांच्या जोड्यांची संयुक्त पाने असतात.

मिकी माऊस फ्लॉवर्स

इतर फुलांबरोबर कासच्या पठारावर ही फुले मोठ्या प्रमाणात आढळतात. पिवळ्या धमक रंगांच्या या फुलांच्या मध्ये लाल रंगाचा आकर्षक ठिपका असतो. त्यामुळे या फुलांचे सौंदर्य खुलून दिसते. त्यांना मिकी माऊस फ्लॉवर्स किंवा डोनाल्ड डक फ्लॉवर्स असेही म्हणतात. जुलैच्या अखेरीस ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत या फुलांचे दर्शन घडते, अशी उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी  दिली.
 

Web Title: Grass Flower Ray Grass Flower, Flower Kavala at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.