अनंतराव आजगावकर यांच्या योगदानापुढे कृतज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:42+5:302021-08-29T04:24:42+5:30

उत्तूर : अनंतराव आजगावकर यांच्या शैक्षणिक कार्यातील योगदानामुळेच त्यांना फाय फाउंडेशन पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या ...

Grateful for the contribution of Anantrao Azgaonkar | अनंतराव आजगावकर यांच्या योगदानापुढे कृतज्ञ

अनंतराव आजगावकर यांच्या योगदानापुढे कृतज्ञ

Next

उत्तूर : अनंतराव आजगावकर यांच्या शैक्षणिक कार्यातील योगदानामुळेच त्यांना फाय फाउंडेशन पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या योगदानापुढे आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत अशा भावना इचलकरंजी येथील फाय फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. एस. पी. मर्दा यांनी व्यक्त केल्या.

येथील हिरकमहोत्सवी आंतरभारती शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष विजय देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस ज्येष्ठ संचालक किरण ठाकूर, संतान लुद्रिक, बी. डी. ढोणुक्षे यांच्यासह २७ पैकी २१ सदस्य उपस्थित होते. यावेळी २०२१ ते २०२४ या तीन वर्षांसाठी नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. अनंतराव आजगावकर संस्थापक मानद सचिव, विजय देसाई अध्यक्ष, डॉ.सागर देशपांडे उपाध्यक्ष, प्रा. नीळकंठ ठाकूर सचिव यांच्या पदाधिकारी निवडीला यावेळी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत अजित माने, लक्ष्मण शिवणे, ॲड. घनश्याम ठाकूर, बी. डी. ढोणुक्षे यांनी भाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष देसाई हे माजी मुख्याध्यापक असून उपाध्यक्ष देशपांडे हे याच शिक्षण संस्थेच्या चिमणे येथील कर्मवीर विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. या शिक्षण संस्थेच्या उत्तूर, चिमणे ता. आजरा, बारवे ता. भुदरगड, विक्रमनगर कोल्हापूर या ठिकाणी एकूण आठ शाखा कार्यरत आहेत. प्राथमिक शाळेपासून ते वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत दोन हजार विद्यार्थी या शिक्षणसंस्थेमध्ये शिक्षण घेतात.

२८०८२०२१ कोल अनंतराव आजगावकर

२८०८२०२१ कोल विजय देसाई

२८०८२०२१ कोल डॉ.सागर देशपांडे

२८०८२०२१ कोल प्रा.नीळकंठ ठाकूर

Web Title: Grateful for the contribution of Anantrao Azgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.