कागल गडहिंग्लज मतदार संघात रामनवमीला महा रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:22 AM2021-04-17T04:22:49+5:302021-04-17T04:22:49+5:30
: मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस. १००१ बाटल्यांचे उद्दिष्ट. कागल : राज्याचे ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या येत्या ...
: मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस. १००१ बाटल्यांचे उद्दिष्ट.
कागल :
राज्याचे ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या येत्या २१ तारखेला रामनवमी दिवशी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कागल गडहिंग्लज विधानसभा मतदार संघात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार याचे आयोजन केले असून एक हजार एक बाटल्या रक्त संकलनाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती हसन मुश्रीफ वाढदिवस गौरव समितीचे अध्यक्ष भैय्या माने यांनी दिली.
नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीस नगराध्यक्षा माणिक रमेश माळी, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, प्रवीण काळबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.
भय्या माने म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा करण्यास विरोध आहे. पण रक्तसंकलन, कोरोना जनजागृती, विकास कामे, जीवनावश्यक वस्तूचे वाटप असे विविध विधायक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.
चौकट कोरोनाची काळजी घेत रक्तदान
कागल शाह, सभागृह, मुरगुड शासकीय दवाखाना, तसेच जिल्हा परिषद मतदार संघात एक असे तालुक्यात सात ठिकाणी आणि गडहिंग्लज, उत्तर, आणि कडगाव कौलगे जिल्हा परिषद मतदार संघात एक नऊ ते दहा ठिकाणी संचारबंदीचे पालन करीत रक्तसंकलन केले जाणार आहेत. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. म्हणून हे महा रक्तदान शिबिर घेतले जात आहे.
● मुश्रीफांचे कार्य रामराज्यासारखे.... माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले की मंत्री मुश्रीफ यांचा जन्मदिवस रामनवमीचा आहे. आणि त्यांचे कार्य रामराज्यासारखे आहे. प्रत्येकाला न्याय देण्याबरोबरच समाजातील उच्च निच्चता संपुष्टात आणून प्रत्येकाला न्याय देण्याचे काम त्यानी केले आहे. घरकूल, वैद्यकीय सेवा, रोजगार, विकास कामे असे मोठे कार्य उभारले आहे.
------------------------
○ कृपया मंत्री मुश्रीफ यांचा सिंगल फोटो वापरावा ही विनंती.