‘स्मार्ट सिटी’मुळे रोजगाराच्या मोठ्या संधी

By admin | Published: October 5, 2015 11:59 PM2015-10-05T23:59:15+5:302015-10-06T00:25:35+5:30

व्ही. व्ही. कार्जीन : जेनेसिस इन्स्टिट्यूूटमध्ये ‘जेनेटिक २०१५’ राज्यस्तरीय कार्यक्रम

A great opportunity for 'smart city' | ‘स्मार्ट सिटी’मुळे रोजगाराच्या मोठ्या संधी

‘स्मार्ट सिटी’मुळे रोजगाराच्या मोठ्या संधी

Next

शिरोली : देशात नव्याने होणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेमुळे अभियंत्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन केआयटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जीन यांनी केले. कासारवाडी येथील जेनेसिस इन्स्टिट्यूटट आॅफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘जेनेटिक २०१५’ राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्जीन म्हणाले, सध्या भारतात नवीन दहा स्मार्ट सिटी होणार आहेत. या मोठ्या शहरात अनेक नवीन बदल घडणार आहेत त्यामुळे भविष्यात या स्मार्ट सिटींना अभियंत्यांची गरज भासणार आहे.
मनदीप पाटील म्हणाले, पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक शिक्षणावर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त भर दिला पाहिजे.
यावेळी महाविद्यालयात घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : आकृती : प्रथम क्रमांक : अलंकार पाटील (जेनेसिस), द्वितीय : अजिंक्य केसरकर (भारती विद्यापीठ), तृतीय: प्रथमेश दीक्षित (जेनेसिस),
आलेख : प्रथम क्रमांक : विकीराज तीरळे, द्वितीय : प्रणय पाटील (अशोकराव माने), तृतीय : राहुल मुळीक (जेनेसिस)
सर्किटो चॅम्प : प्रथम क्रमांक : तेजस लुगडे (अशोकराव माने), द्वितीय : अलोककुमार दत्त (डी. वाय. पाटील), तृतीय : संदीप शिपेकर, ओंकार पाटील (जेनेसिस)
म्युट्रॉन : प्रथम क्रमांक : ओंकार महाडेश्वर, अक्षय नीळकंठ, द्वितीय : भगवान पाटील, सागर माळकर (केआयटी), तृतीय : शीतल शिंदे, शर्मिली साळोखे (जेनेसिस),
फिल्डस्टार : प्रथम क्रमांक : किरण पाटील (डी. वाय. पाटील), द्वितीय : सुबोध आडके (जेनेसिस), तृतीय : ऋषिकेश अत्याळकर (वाय. डी. माने). तुल्यशक्ती : प्रथम क्रमांक : सागर माळी, अमर सांगले, द्वितीय : प्रवीण पाटील, रोहन पाटील (तात्यासाहेब कोरे), तृतीय : प्रवीण तोडकर, विनायक म्हमाणे (डिओटी, शिवाजी विद्यापीठ)
पोस्टर प्रेझेंटेशन : प्रथम क्रमांक : नवाज पठाण, श्रेयश लिगाडे (संजय घोडावत), द्वितीय : केतकी स्वामी, दिशा वेद (अशोकराव माने), तृतीय : क्षितीज देठे, सुदाम मकानदार (आण्णासाहेब डांगे), अधिका जोशी (जेनेसिस)
यक्षप्रश्न : प्रथम क्रमांक : अक्षय पाटील, प्रशांत मांडवकर (संजय घोडावत), द्वितीय : रोहित कुमार, शिवानंद मोरे (डी. वाय. पाटील) तृतीय : ऋषिकेश कवठेकर, उदय हरदास (जेनेसिस). आॅटोमॅनिया : प्रथम क्रमांक : रितेश शिंदे, अक्षय पाटील (डी. वाय. पाटील), द्वितीय : महेश नाईकवाडे, सागर ओंबाळकर (केआयटी) तृतीय : सुरज नाईक, कुणाल मोरे (जेनेसिस) हे विद्यार्थी विजयी झाले. प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव प्रा. एन. व्ही. पुजारी, ए. एस. आंबेकर, गणेश खद्रे, उपाध्यक्ष मितेश गवळी यांनी स्पर्धेचे आयोजन केले. गौरी पुजारी, उमा पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. एन. व्ही. पुजारी यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: A great opportunity for 'smart city'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.