कोल्हापुरकरांना कोरोनाचा मोठा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:27+5:302021-07-21T04:17:27+5:30
कोल्हापूर: कोरोनाचा रुग्णाचा आकडा ८५२ पर्यंत खाली आल्याने मंगळवारी कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला. त्याचवेळी जोराचा पाऊस सुरू झाल्याने ...
कोल्हापूर: कोरोनाचा रुग्णाचा आकडा ८५२ पर्यंत खाली आल्याने मंगळवारी कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला. त्याचवेळी जोराचा पाऊस सुरू झाल्याने आता कोरोनाची धास्ती मिटली आणि त्याची जागा आता पुराच्या चिंतेने घेतली आहे. त्यातच दोन दिवस जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केल्याने कोल्हापूरकरांच्या छातीत धस्स होऊ लागले आहे.
रविवारी २ हजारावर आकडा गेल्याने कोल्हापूरकर धास्तावले होते; पण सोमवारी परत १,१५८ पर्यंत आकडा खाली आल्याने धास्ती कमी झाली होती. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्याने बऱ्यापैकी चिंता मिटली आहे. २० मृत्यू झाले आहेत तर १,०९४ कोरोनामुक्त झाले आहेत. कागलमध्ये सर्वाधिक चौघांचा मृत्यू झाला आहे तर कोल्हापूर शहर, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यात प्रत्येकी तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
आता कोल्हापुरात निर्बंधाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सर्व नियम अटीचे पालन करून व्यवहारही सुरू झाले आहेत. त्याचाही मंगळवार हा दुसरा दिवस होता. रुग्णसंख्या कमी झाल्याने या व्यवहारांना आता आणखी चालना मिळणार आहे.
आजचे मृत्यू:
कोल्हापूर शहर: ०३ मंगळवारपेठ, कसबा बावडा, साईक्स एक्सटेशन,
करवीर: ०२ मोरेवाडी, पाचगाव,
हातकणंगले: ०३ हेर्ले, इचलकरंजी, हातकणंगले,
भूदरगड: ०१ पळशिवणे,
कागल : ०४ व्हन्नूर, करंजिवणे, कागल, बोरवडे
पन्हाळा: ०१ कोडोली,
शिरोळ : ०२ टाकळीवाडी, जयसिंगपूर,
गडहिग्लज: ०३ गडहिग्लज, अत्याळ, कडगाव,
आजरा: ०१ मडिलगे