डोळ्यासमोर आदर्श असल्यास महान कार्य घडते -श्रीकांतानंदजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:55 AM2019-03-08T00:55:31+5:302019-03-08T00:56:22+5:30
डॉ. बापूजी साळुंखे यांनी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. डोळ्यासमोर आदर्श असला, की माणूस महान कार्य करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे
कोल्हापूर : डॉ. बापूजी साळुंखे यांनी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. डोळ्यासमोर आदर्श असला, की माणूस महान कार्य करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे होय. असे प्रतिपादन पुण्याच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष श्रीकांतानंदजी महाराज यांनी केले.
कºहाड येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात शि. म. डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. याप्रसंगी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, शेखर चरेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. विजया पवार व शोभा लोहार यांनी, प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील यांनी प्रास्ताविक, प्रा. आदिकराव कणसे यांनी आभार मानले.