कुंभी नदीच्या पाण्याला हिरवट, काळा रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:21 AM2021-04-26T04:21:04+5:302021-04-26T04:21:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : कुंभी नदीच्या पात्रातील पाण्याला हिरवा काळा रंग आला आहे. आडूर (ता. करवीर) गावापर्यंत दूषित ...

Green, black color to the water of Kumbhi river | कुंभी नदीच्या पाण्याला हिरवट, काळा रंग

कुंभी नदीच्या पाण्याला हिरवट, काळा रंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : कुंभी नदीच्या पात्रातील पाण्याला हिरवा काळा रंग आला आहे. आडूर (ता. करवीर) गावापर्यंत दूषित व हिरवट काळे पाणी दिसत आहे. याच नदीच्या पात्रात पाच-सहा गावांच्या पिण्यासाठी पाणी पुरवठा करणारे जॅकवेल असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कळे (ता. पन्हाळा) येथील बंधाऱ्याच्या खालीपासून पूर्वेला असणाऱ्या कुंभी नदीच्यापात्रात गेल्या आठ दिवसांपासून काळे हिरवट रंगाचे पाणी असून त्याची दुर्गंधी येत आहे. या नदीपात्रात करवीर तालुक्यातील चिंचवडे, भामटे, कळंबे तर्फ कळे, आडूर, कोपार्डे ,सांगरुळ या पाच तर मरळी, मोरेवाडी या पन्हाळा तालुक्यांतील दोन गावांच्या पिण्याचा पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल आहेत. येथूनच सात गावांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो.

असे काळपट हिरवट तवंग असणारे दूषित पाणी पिण्यासाठी वापरल्याने साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चौकट १) कळे बंधाऱ्याच्या पूर्वेला काळे हिरवट तर पश्चिमेला शुद्ध पाणी असल्याचे स्पष्ट दिसते. गेला आठवडाभर अगदीच दहा फुटाच्या फरकात अलीपलीकडे पाण्यातील फरक स्पष्ट दिसत असल्याने नदीवर येणारे शेतकरी व नागरिकांत चर्चा आहे. २) कुंभी कासारी कारखाना बंद असल्याने त्यातून बाहेर पडणारे पाणी आता पूर्णपणे बंद झाले आहे. यामुळे कारखान्याचे पाणी मिसळणे अशक्य आहे. मग हे पाणी दूषित कशामुळे झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे

प्रतिक्रिया

कुंभी नदीचे पाणी अत्यंत काळे हिरवट झाले आहे. असे पाणी पिण्यासाठी पुरवठा केल्यास साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे व पाणी दोन दिवस प्रवाही करावे.

-सरदार पाटील, सरपंच कळंबे तर्फे कळे

विद्युत पंप सुरू कारायला कळे बंधाऱ्यावर येतो. पण गेली आठ दिवस बंधाऱ्याच्या पश्चिमेला पाणी एकदम स्वच्छ आहे तर उलट पूर्वेला काळेहिरवट पाणी झाल्याचे स्पष्ट दिसते

-तानाजी पाटील, शेतकरी

फोटो

कुंभी नदीच्या पाण्याला हिरवा काळा रंग आला असून पाणी दूषित झाले आहे.

Web Title: Green, black color to the water of Kumbhi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.