हिरवी शाळा! सुंदर शाळा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:00 AM2019-04-10T00:00:24+5:302019-04-10T00:01:02+5:30

भारत पाटील सरपंच संघटनेमुळं गावांची कामं सर्वच शासकीय कार्यालयात झपाट्याने होऊ लागली होती. संघटना स्थापन झाल्यानंतर आम्ही सर्वजण सतत ...

Green School! Beautiful school | हिरवी शाळा! सुंदर शाळा,

हिरवी शाळा! सुंदर शाळा,

Next

भारत पाटील
सरपंच संघटनेमुळं गावांची कामं सर्वच शासकीय कार्यालयात झपाट्याने होऊ लागली होती. संघटना स्थापन झाल्यानंतर आम्ही सर्वजण सतत एकत्र येऊ लागलो. बसू लागलो. वेगळेवेगळे विषय चर्चिले जाऊ लागले. पंचायत समितीने नेहमीच फङ्म४३्रल्ली ६ङ्म१‘ सोडून काही तरी सामाजिक उपक्रम हाती घ्यावा, असं मात्र माझ्यासह सर्व माझ्या पंचायत समिती सदस्यांना पण वाटत होतं. प्रशिक्षणावेळी विविध लोकांच्या मार्गदशनांनी आम्ही सगळे अगदी भारावून गेलो होतो. यामध्ये पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारची यशोगाथा सांगितली होती. यात पाणी व पर्यावरण याविषयी सविस्तर कथन केले होते. याला अनुसरून आपण काय करावे? कोणता कार्यक्रम हाती घ्यावा? ही चर्चा सुरू होती.
यावेळी कृषी विस्तार अधिकरी एस. व्ही. शिंदे व निकमवाडीचे राजू खोत यांनी आपण वृक्षारोपण कार्यक्रम सर्व गावांत घेऊया, असे सुचविले. हे मला खूपच आवडले होते. वृक्षारोपण हा कार्यक्रम न होता हे एक अभियान व्हावे, ही माझी प्रामाणिक इच्छा बोलून दाखविली. गटशिक्षण अधिकरी सूर्यकांत पाटील यांनी हा उपक्रम शाळेतून राबवावा, असे सुचविले.
५ जून हा पर्यावरण दिवस म्हणून साजरा करूया व त्या दिवसापासून सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरू करूया, असे सुचविले. ‘हिरवी शाळा, सुंदर शाळा’ असे अभियान हाती घेऊन ‘एक मूल, एक झाड’ असे या अभियानाचे स्वरूप असावे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व सीनियर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व मुले व मुलींना सहभागी करण्याबाबत सुचविले. मुलांनी श्रमदान करून खड्डे तयार करावेत, झाड लावावे व ते जोपर्यंत आपण त्या शाळेत शिक्षण घेतोय तोपर्यंत ते झाड जगवायची जबाबदारी त्या त्या विद्यार्थ्याची राहील, असे ठरविले होते.
झाडे कुठून उपलब्ध करायची? ही मोठी समस्या होती. बऱ्याच सरपंचांनी आम्ही ग्रामपंचायतीच्यावतीने लागतील तेवढी रोपं पुरवितो असं सांगितले होते. तरी पण मी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सर्व सदस्य व अधिकारी यांच्यासमोर हा विषय मान्यतेसाठी ठेवला होता. त्यावेळी सामाजिक वनीकरणचे लागवड अधिकरी पंडितराव यांनी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमधून आम्हाला जर वाढीव निधी दिलात तर सामाजिक वनीकरण विभाग तुम्हाला लागतील तेवढी रोपं देऊ शकतो, असे सांगितले. यावेळी तत्काळ प्रस्ताव, आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली. यात शाळा परिसर बरोबरच काही रस्ते दुतर्फा व खुल्या जागेतही वृक्षारोपण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मला पंडितराव व त्यांच्या टीमचा खूप अभिमान नेहमीच वाटला. कारण त्यांनी खूपच ट्रू१ङ्म स्र’ंल्लल्ल्रल्लॅ केलं होतं. ५ जून या पर्यावरण दिवशी छोटा कार्यक्रम घेऊन हे अभियान आम्ही सुरू केलं. सर्व ग्रामसेवक, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची एकदिवसीय मिटिंग घेतली. उपक्रम कसा प्रभावी राबविता येईल, याविषयी नियोजन केले. मी स्वत: प्रत्येक गावांत जाणार होतो. ग्रामपंचायत व शाळा आणि विद्यार्थी यांनी आपला सहभाग खूप मनापासून दिला होता. गावात गेलो की, वृक्षदिंडी काढली जात होती. मुलांच्यासोबत खड्डे काढणे, माती घालणे, झाड लावणे व पाणी घालणे यांत मी मनापासून खूप रमलो होतो. यांत मोहरे हायस्कूल, पुनाळ विद्यामंदिर, हारपवडे विद्यामंदिर, अशी अनेक उदाहरणे देता येतील. साडेतीन महिन्यांच्या काळात बघताबघता जवळजवळ सव्वा तीन लाख (३.२५) झाडे लावली होती. त्यावेळी १७८ प्राथमिक शाळा, ६४ हायस्कूल, २२ ज्युनिअर कॉलेज व चार सीनियर कॉलेजमध्ये आम्ही खूप प्रभावी अभियान राबवू शकलो होतो. याबरोबरच संजीवन पन्हाळा व पन्हाळा पब्लिक स्कूल या खासगी शाळेतील विद्यार्थी पण सहभागी झाले होते. जाखले येथील वृक्षारोपण जगविण्यासाठी वनीकरण विभागाने जाखले-बहिरेवाडी स्कीमचं तीन वर्षे पाणी विकत घेतलं होतं. शाळांमध्ये निबंध, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा पण शिक्षकांनी घेतल्या होत्या. पंचायत समिती पन्हाळ्याचा महाराष्ट्र शासनाच्या ‘वनश्री पुरस्कारा’नी आमचा गौरव करण्यात आला. यावेळी विजय पाटील हे पन्हाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. यात नगरपालिकांनी पण सहभाग दाखविला होता. त्यांनी सामाजिक वनीकरण व वन विभागाबरोबर ट्राय पार्टी करार करून पावनगड रस्त्यालगत वृक्ष संग्रहालय केले. यामध्ये किरण यादव, आसिफ मोकाशी, कमलाकर भोसले आदी नगरसेवक यांचाही सहभाग होता.
(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती
चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Green School! Beautiful school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.