सव्वादोन महिन्यांनंतर लाईट, कॅमेरा ॲक्शन -चित्रपट, मालिका चित्रीकरणाला ग्रीन सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 02:15 PM2020-06-01T14:15:33+5:302020-06-01T14:17:26+5:30
यामुळे कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विविध संघटना, संस्थांनी राज्य शासनाकडे चित्रीकरणाला परवानगी देण्याबाबत मागणी केली होती. विशेषत: कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्याबाबत सर्वांनी जोर धरला होता.
कोल्हापूर : चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने रविवारी या संदर्भातील आदेश काढले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील सर्व अटी आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापुरात चित्रीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. यामध्ये चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरणही थांबले आहेत. परिणामी कलाकारांसह अनेक कामगारांचे काम थांबले आहे. सध्या शासनाने लॉकडाऊन शिथिल केला आहे. यामुळे कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विविध संघटना, संस्थांनी राज्य शासनाकडे चित्रीकरणाला परवानगी देण्याबाबत मागणी केली होती. विशेषत: कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्याबाबत सर्वांनी जोर धरला होता.
यावर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी रविवारी उशिरा चित्रीकरणाला सशर्त परवानगी दिल्याचे आदेश काढले. यामध्ये कोरोनासंदर्भातील कोणत्याही निर्बंधांचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने चित्रीकरण करावे. असे आढळल्यास चित्रीकरण तत्काळ बंद करण्यात येईल. चित्रीकरणाची परवानगीसाठी संबंधित जिल्हाधिकारी तसेच चित्रपट, रंगभूमी विकास महामंडळ यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे.
सव्वादोन महिन्यांनंतर लाईट, कॅमेरा ॲक्शन
कोरोनामुळे चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला ब्रेक लागला आहे. तसेच श्रोत्यांनाही जुन्या मालिका पाहण्याची वेळ आली आहे. सव्वादोन महिन्यांनंतर अखेर लाईट, कॅमेरा आणि ॲक्शनचा आवाज घुमणार आहे. तसेच श्रोत्यांना नवीन मालिका पाहण्याची लवकरच मिळणार आहे.
कोल्हापुराला प्राधान्य
मुंबई, पुणे येथे रेड झोन असल्यामुळे या ठिकाणी चित्रीकरणासाठी कोणी पुढाकार घेतील याची शाश्वती फार कमी आहे. याचबरोबर कोल्हापुरातील चित्रनगरीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असून कलाकार वर्गही मोठा आहे. त्यामुळे कोल्हापुराला प्राधान्य मिळेल असे चित्र आहे. त्यामुळे कलानगरीतील कलाकारांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार, हे निश्चित आहे.