अब्दुललाटमध्ये ऊस वाहतुकीला ग्रीन सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:24+5:302020-12-07T04:18:24+5:30

अब्दुललाट : अब्दुललाट येथील रिंगरोड रस्त्याचा विषय संपुष्टात आला आहे. सर्व शेतकरी, आंदोलनकर्ते, राजकीय नेते, ग्रामपंचायत प्रशासन यांच्या प्रयत्नाने ...

Green signal to sugarcane transport in Abdullat | अब्दुललाटमध्ये ऊस वाहतुकीला ग्रीन सिग्नल

अब्दुललाटमध्ये ऊस वाहतुकीला ग्रीन सिग्नल

googlenewsNext

अब्दुललाट : अब्दुललाट येथील रिंगरोड रस्त्याचा विषय संपुष्टात आला आहे. सर्व शेतकरी, आंदोलनकर्ते, राजकीय नेते, ग्रामपंचायत प्रशासन यांच्या प्रयत्नाने ऊस वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेले महिनाभर गळीत हंगाम सुरू होऊनही अब्दुललाट येथील काही शेतकऱ्यांच्या उसाला तोड नाही. ऊस वाहतूक वाहनांची ने-आण रिंगरोड या गावाबाहेरील रस्त्याने व्हावी, यासाठी गावातील काही नागरिकांनी ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी ग्रामपंचायत, आंदोलनकर्ते व शेतकरी यांच्यात अनेकदा तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठका झाल्या. त्यामध्ये रस्त्याची प्रत्यक्ष मोजणी करून त्यावर असलेले अतिक्रमण काढून टाकून वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय झाला. यावेळी मोजणी करून ग्रामस्थांच्या सहमतीने दहा फुटाचा रस्ता खुला करण्याचा निर्णय झाला.

यासाठी सरपंच पांडुरंग मोरे, सचिन पाटील, मिलिंद कुरणे, प्रमोद कांबळे, किरण कुरणे, शीतल कुरणे, सतीश कुरणे, दादा मोहिते, मानसिंग भोसले, नीलेश कांबळे, प्रदीप कांबळे यांनी प्रयत्न केले.

Web Title: Green signal to sugarcane transport in Abdullat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.