महापालिकेच्या शाळेस ग्रीनबोर्ड भेट, माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:10+5:302021-03-15T04:23:10+5:30
माने विद्यालयातील काही माजी विद्यार्थी या शाळेत आवर्जून भेट देत असतात. तेथील असुविधा पाहून त्या दूर करण्याचा तसेच आवश्यक ...
माने विद्यालयातील काही माजी विद्यार्थी या शाळेत आवर्जून भेट देत असतात. तेथील असुविधा पाहून त्या दूर करण्याचा तसेच आवश्यक त्या भौतिक सुविधा देण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात म्हणून नितीन जाधव, दिलीप वायदंडे, तानाजी कवाळे, पंडित पोवार, शफीक देसाई यांनी वर्गखोल्यांना ग्रीन बोर्ड दिले. शाळेच्या डागडुजीसाठी तसेच रंगरंगोटी करण्यासाठी दहा लाखांचा निधी माजी नगरसेवक महेश सावंत यांनी उपलब्ध करून दिला असून, त्याची कामेही सुरू झाली आहेत.
पुढील काही महिन्यात शाळेची पटसंख्या वाढविण्यासह शाळा सुधारणा करण्याचे सामूहिक प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले. यावेळी श्रीकांत पोतदार, भारत चव्हाण, सुनील कुरणे, राजू मगदूम, शेखर पाटील, पंडित पोवार, दिलीप वायदंडे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका चौगुले मॅडम व शिक्षक जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी एव्हरेस्ट शिखर मोहिमेवर जाणाऱ्या कुमारी सावेकर हिला शुभेच्छा देण्यात आल्या.
फोटो क्रमांक - १४०३२०२१ -कोल- केएमसी
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक आठ, दत्ताजीराव माने विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेला उत्तम दर्जाचे ग्रीन बोर्ड भेट देण्यात आले.