आजऱ्यात कास्ट्राईब संघटनेच्यावतीने आंबेडकरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:32+5:302020-12-08T04:21:32+5:30
येथील कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कणकवली एस.टी. विभागाचे एम.ई.ओ. ...
येथील कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
कणकवली एस.टी. विभागाचे एम.ई.ओ. रमेश कांबळे अध्यक्षस्थानी होते. भारतीय बौद्ध महासभा आजरा अध्यक्ष गणपती राजदीप यांनी त्रिशरण व पंचशील गाथा सांगितली.
बुद्धमूर्तीचे पूजन आजरा शिक्षक संघाचे अध्यक्ष मायकेल फर्नांडीस यांनी, तर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज जाधव यांनी केले.
डॉ. विद्या त्रिरत्ने यांनी बाबासाहेबांनी समाजातील मराठ्यांसह सर्वच वंचित घटकांना संविधानाच्या माध्यमातून न्याय, हक्क व अधिकार मिळवून दिले. मात्र, ते हक्क आज काही शक्ती हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी संघटितपणे लढा उभारण्याची गरज आहे. या कार्यक्रमाचे संयोजन दशरथ कांबळे, संजीव नाईक, विठ्ठल धनवे, भिकाजी कांबळे, दिलीप कांबळे, कृष्णा दावणे, आबासाहेब मोहिते, निलांबरी कांबळे, प्रीती कांबळे यांनी केले.
यावेळी विश्वास कांबळे, अजय देशमुख, डॉ. उल्हास त्रिरत्ने, गौतम कांबळे, गौतम मोरे, अरविंद देशमुख, रामचंद्र कांबळे, अमित गणाचारी, रवी भोसले, अनिल कांबळे, शरद कुंभार, रवींद्र दोरुगडे, शिवाजी बोलके, पांडुरंग पाटील, युनूस लाडजी, रवींद्र कोंडुस्कर, उमाजी कुंभार, राहुल मोरे, आदी उपस्थित होते.
अध्यक्ष सुनील कांबळे यांनी स्वागत यांनी केले. दशरथ कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी सम्राट यांनी आभार मानले.