भुदरगड किल्ल्याची स्वच्छता करून गिर्यारोहकाला अभिवादन

By admin | Published: December 30, 2014 09:14 PM2014-12-30T21:14:54+5:302014-12-30T23:40:29+5:30

वनमित्र संस्थेचा उपक्रम : बुरूज, तटबंदीची केली सफाई

Greetings to the climb by cleaning the Bhudargarh fort | भुदरगड किल्ल्याची स्वच्छता करून गिर्यारोहकाला अभिवादन

भुदरगड किल्ल्याची स्वच्छता करून गिर्यारोहकाला अभिवादन

Next

कागल : येथील वनमित्र संस्थेच्यावतीने किल्ले भुदरगड येथे नुकतीच स्वच्छता आणि किल्ले संवर्धन मोहीम राबविण्यात आली. दिवंगत युवा गिर्यारोहक कार्तिक विनोद कांबोज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावरील भैरवनाथ मंदिराच्या पश्चिम बाजूस असणारा बुरूज आणि त्याची तटबंदी याची स्वच्छता केली. कोल्हापुरातील कार्तिक कांबोज या युवा गिर्यारोहकाचे दोन वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. गिर्यारोहण या धाडशी क्रीडा प्रकारात त्यांनी तरुण वयात मोठी झेप घेतली होती. किल्ल्याच्या संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेत ते नेहमी सहभागी होत होते. म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही मोहीम आखली होती, असे संस्थाध्यक्ष अशोक शिरोळे यांनी सांगितले. कार्तिक कांबोज यांच्या प्रतिमेचे पूजन मिथुन कल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्ही. डी. पाटील (आकुर्डे) यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेत बाळ जाधव, काशीनाथ गारगोटे, लखन मुरगुडे, राजू घोरपडे, सुनील जाधव, नाना बरकाळे, अमोल मगर, रोहन जाधव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Greetings to the climb by cleaning the Bhudargarh fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.