क्रांतिनेते चिमासाहेब महाराज यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 06:47 PM2020-05-15T18:47:16+5:302020-05-15T18:48:21+5:30
थोर क्रांतिनेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी महापालिकेच्यावतीने टाऊन हॉल, चिमासाहेब चौक, क्रांति उद्यान येथील त्यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. महापौर निलोफर आजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
कोल्हापूर : थोर क्रांतिनेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी महापालिकेच्यावतीने टाऊन हॉल, चिमासाहेब चौक, क्रांति उद्यान येथील त्यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. महापौर निलोफर आजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
चिमासाहेब महाराज यांचा जन्म १८३१ मध्ये कोल्हापूरच्या राज घराण्यात झाला. उमेदीच्या काळात त्यांनी ब्रिटिश सरकारचे अस्तित्व झुगारून त्यांच्या विरुद्ध लढा दिला. १८५७ साली पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे रणशिंग फुंकले गेले.
या लढ्याचे दक्षिण भारताचे नेतृत्व छत्रपती चिमासाहेब महाराजांनी केले होते. या लढ्याचे ते प्रेरणास्रोत होते. अशा या थोर क्रांतिकारकांची गुरुवार १५ मे रोजी पुण्यतिथी होती. चिमासाहेब चौकातील क्रांती उद्यानमधील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी वैभवराज राजेभोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रसाद जाधव यांनी केले. नगरसेविका मेहजबीन सुभेदार, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, स्वरूपसिंह राजेभोसले, महादेव पाटील उपस्थित होते.