गडहिंग्लज तालुक्यात महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:22 AM2021-04-15T04:22:21+5:302021-04-15T04:22:21+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात महामानव व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात महामानव व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून सर्वत्र साधेपणाने प्रतिमापूजन झाले.
* शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज.
शहरातील शिवराज महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्रा. अनिल कुराडे होते. प्रा. ए. के. मोरमारे, डॉ. जी. जी. गायकवाड, डॉ. सुधीर मुंज यांनी मनोगत व्यक्त केले.
* गडहिंग्लज नगर परिषद, गडहिंग्लज
गडहिंग्लज : येथील पालिका सभागृहात नगराध्यक्ष स्वाती कोरी यांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगरसेवक उदय पाटील, नगरसेविका सुनीता पाटील, वीणा कापसे, शकुंतला हातरोटे, रेश्मा कांबळे, लेखापाल शशिकांत मोहिते, अनिल चव्हाण, ओमकार बजागे, राजेंद्र भुईंबर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
* प्रांत कार्यालय, गडहिंग्लज.
येथील प्रांत कार्यालय आवारातील पुतळ्याला जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत विटेकरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समितीचे उपाध्यक्ष रोहित सलवादे, कार्याध्यक्ष पुंडलिक सावरे, खजानिस संतोष कांबळे, आप्पासाहेब बारामती, संजय सावरे, अनिल सावरे, हर्षदा सावरे, प्रकाश कांबळे, मोहन बारामती, उमेश बारामती, दिलीप म्हेत्री, दिगंबर विटेकरी, पूनम म्हेत्री, आदी उपस्थित होते.
* घाळी महाविद्यालय, गडहिंग्लज.
शहरातील डॉ. घाळी महाविद्यालयात प्राचार्य मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. एस. एस. संघराज, डॉ. डी. एम. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हरिभाऊ पन्हाळकर, एम. डी. पुजारी आदी उपस्थित होते.
* ओंकार महाविद्यालय, गडहिंग्लज.
येथील ओंकार महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी डॉ. अनिल पाटील, काशिनाथ तनंगे, भीमराव शिंदे, धर्मवीर क्षीरसागर, समीर कुलकर्णी, प्रकाश कांबळे, अमर पोवार, कृष्णा गायकवाड आदी उपस्थित होते.
* भीमनगर, गडहिंग्लज
शहरातील भीमनगर परिसरात नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी महेश सलवादे, प्रकाश कांबळे, काशिनाथ तनंगे, लता पालकर, नगरसेवक वीणा कापसे, सुनीता पाटील, रेश्मा कांबळे, शकुंतला हातरोटे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
* आर्दाळमध्ये महामानवाला अभिवादन
उत्तूर : आर्दाळ (ता. आजरा) येथे सरपंच विद्याधर गुरव व उपसरपंच अमोल बांबरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. सामाजिक कार्यकर्ते कॉ. शिवाजी गुरव यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटना यांच्या प्रतिमेचेही पूजन झाले. यावेळी ग्रामसेवक जाधव, शिवाजी कांबळे, शीला कांबळे, संभाजी कांबळे, अलका ससाणे, सुखदेव ससाणे, मिथुन नाडकर्णी, महेश कांबळे, श्रीपाल कांबळे, विशाल गुरव आदी उपस्थित होते.
* हलकर्णीत आंबेडकर जयंती उत्साहात
हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे आंबेडकर जयंतीनिमित्त भीमज्योत आणण्यात आली. यावेळी घोषणा व फटाक्यांची आतषबाजी, निळे झेंडे व आंबेडकर भवन परिसरात रांगोळीचा सडा घालण्यात आल्याने परिसर भीममय झाला होता. उपसरपंच सलीम यमकनमर्डी, उद्योजक सुमीत संगाज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर नीता मऱ्यापगोळ, अविनाश दुध्यागोळ, काशिनाथ रवेदार, गजानन सुनाईक यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी रवींद्र किणेकर, संजय लब्यागोळ, नागेश म्हेत्री, रेखा रवेदार, नम्रता सुरनाईक आदींसह समाजबांधव उपस्थित होते. चंद्रकांत गुरवानगोळ यांनी आभार मानले.
* उत्तूर येथे आंबेडकर जयंती
उत्तूर : येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच वैशाली आपटे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, महेश करंबळी, महेंद्र कामत, गणपती चव्हाण, राजू येसादे, महादेव मोरवाडकर, आदी उपस्थित होते.
* नूल परिसरात महामानवाला अभिवादन
नूल : नूल येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पर्यवेक्षक गणपती चोथे यांच्या हस्ते, रामलिंग हायस्कूलमध्ये भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते, ग्रामपंचायतीमध्ये सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, ग्रामविकास अधिकारी अमृतराव देसाई यांच्या हस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. अनिल नेवडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. येणेचवंडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच भारत झळके, उपसरपंच तानाजी कुराडे, ग्रामसेवक विजय जाधव यांच्या हस्ते, ज्ञानदीप वाचनालयामध्ये सचिव प्रकाश इंगळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. खणदाळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तायगोंडा देसाई, ए. पी. सुतार, ग्रामपंचायतीमध्ये सरपंच गजानन घोडके, उपसरपंच सविता मगदूम, ग्रामसेवक डी. एस. ढेंगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मनवाड येथे सरपंच डॉ. ज्ञानप्रकाश रेडेकर, उपसरपंच वैभवी लोखंडे तर नरेवाडी येथे सरपंच अंकुश रणदिवे यांच्या हस्ते, कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अरूण येसरे, बाळासाहेब मोहिते यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.
नूल येथील जयभीम तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून घरोघरी प्रतिमापूजन करण्याचे आवाहन केले.
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथील भीमनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनावेळी नगराध्यक्ष स्वाती कोरी, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, महेश सलवादे, प्रकाश कांबळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
क्रमांक : १४०४२०२१-गड-०४