सेनापती कापशीत हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:37 AM2020-12-14T04:37:52+5:302020-12-14T04:37:52+5:30
गारगोटी येथील कचेरीत १३ डिसेंबर १९४२ रोजी झालेल्या गोळीबारात हौतात्म्य प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना या दिवशी अभिवादन करण्यात येते. ...
गारगोटी येथील कचेरीत १३ डिसेंबर १९४२ रोजी झालेल्या गोळीबारात हौतात्म्य प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना या दिवशी अभिवादन करण्यात येते. येथील गणश्री तरुण मंडळाच्या वतीने गारगोटी येथून आणलेल्या क्रांतिज्योतीचे स्वागत हुतात्मा स्वामी, हुतात्मा इंगळे परिवारातील सदस्य, आजी-माजी सैनिक यांनी केले.
हुतात्मा इंगळे चौक येथील ध्वजारोहण माजी सैनिक अशोक शंकर जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले . हुतात्मा स्वामी सोसायटी येथील ध्वजारोहण सैनिक सचिन कृष्णा हंचनाळे यांच्या हस्ते, तर हुतात्मा स्मारकामध्ये माजी सैनिक आजम भालदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी गणश्री तरुण मंडळाचे कार्यकर्ते, आजी-माजी सैनिक, मा. पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, राणी अहिल्याबाई वाचन मंदिराचे अध्यक्ष सुनील चौगले, नामदेवराव इंगळे, शामराव इंगळे, जीवन इंगळे, शेखर स्वामी, चंद्रकांत सणगर, ग्रामपंचायतीचे सदस्य धनाजी सेनापतीकर, सुधाकर वारुशे, मुस्ताक देसाई, प्रवीण नाईकवाडे, राजूकाका भोसले, बाबासाहेब गुरव, आदी उपस्थित होते.