शाहू जन्मस्थळी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2017 01:39 PM2017-06-26T13:39:58+5:302017-06-26T13:39:58+5:30
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
लोकमत आॅनलाईन
कोल्हापूर, दि. २६ : राजर्षी शाहू महाराज यांच्या १४३ व्या जयंती निमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देवून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, अप्पर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत आर. एस. पाटील, जेष्ठ विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, वसंतराव मुळीक, इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत, स्थायी समितीचे सभापती संदीप नेजदार, संदीप देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शाहु जन्मस्थळाचे काम उत्कृष्ट झाले असून या ठिकाणी जागतीक किर्तीचे संग्रहालय व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलाला १३ कोटीचा निधी निश्चितपणे उपलब्ध करुन दिला जाईल. त्यासाठीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून त्याच्या पहिल्या टप्प्यात दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून कामालाही लवकरच सुरुवात होईल. जसजसी कामे पुर्ण होत जातील तसतसे निधी उपलब्ध करुन दिले जातील. यासंदर्भात दि. २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येऊन कामासंदर्भात झालेली पुर्व तयारी व पुढील कामांची आवश्यकता यांचा आढावा घेण्यात येईल.
दसरा चौकातही जयजयकार
दरम्यान ऐतिहासिक दसरा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळयाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आमदार सतेज पाटील ,कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक न्याय विभागातर्फे समाता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शाहू महाराजांची वेषभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झांज पथक, लेझीम पथक, शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्षवेधी चित्ररथासह शाहू महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.