Shahu Maharaj Jayanti Kolhapur : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहू प्रेमीचे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 11:23 AM2021-06-26T11:23:54+5:302021-06-26T12:57:36+5:30
Shahu Maharaj Jayanti Kolhapur : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर मधील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, समरजितसिंह घाटगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, इतिहास संशोधक, शाहू प्रेमी व मान्यवर उपस्थित होते.
दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पालकमंत्री पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्राम विकास मंत्री मुश्रीफ, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खासदार मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आमदार जयंत आसगावकर, समरजीत घाटगे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिकतर्फे शाहू महाराज जयंती साजरी
महापालिकेतर्फे लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील जन्मस्थळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस आणि दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळ, महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहातील शाहू महाराज यांच्या अर्धपुतळयास प्रशासक डॉ. बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार मंडलिक, आमदार जाधव, ऋतुराज पाटील, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संदीप घार्गे, चेतन कोंडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उप-शहर अभियंता हर्षजीत घाटगे, नारायण भोसले, माजी नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, अशोक जाधव, संदिप नेजदार, सुभाष बुचडे, सत्यजीत कदम, सुनिल कदम, माजी नगरसेविका माधुरी लाड, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, कादर मलबारी, गणी आजरेकर, बाबा पार्टे आदी उपस्थित होते.