बेळगावात शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:27 AM2021-02-09T04:27:44+5:302021-02-09T04:27:44+5:30

बेळगाव : निवडणूक आली की, सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये मतमतांतरे व भेद निर्माण होतात, हे सर्व थांबले पाहिजे. सीमाभागातील ...

Greetings to Shiv Sena martyrs in Belgaum | बेळगावात शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन

बेळगावात शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन

googlenewsNext

बेळगाव : निवडणूक आली की, सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये मतमतांतरे व भेद निर्माण होतात, हे सर्व थांबले पाहिजे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला सर्वांनी संघटित उत्तर देणे हीच खरी शिवसेनेच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले.

मुंबई येथे ८ फेब्रुवारी १९६९ रोजी बेळगाव सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम सोमवारी सकाळी शहरातील सम्राट अशोक चौक येथे पार पडला. यावेळी बोलताना शुभम शेळके यांनी नेहमीप्रमाणे आपले परखड विचार व्यक्त केले. यार कार्यक्रमाच्या प्रारंभी हौतात्म्य पत्करलेल्या शिवसैनिकांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शिवसेनेच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना शेळके म्हणाले की, बेळगाव, कारवार बिदर, भालकीसह समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांची संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्याची तीव्र इच्छा आहे. सीमा लढ्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

माजी ता. पं. सदस्य कृष्णा हुंदरे यांनी सीमाप्रश्नी ६७ शिवसैनिकांनी आपले बलिदान दिल्याचे सांगून हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना सीमाभागातील मराठी जनतेची खरी कळकळ होती, असे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विद्यमान सरकार सीमा प्रश्नाची निश्चितपणे तड लावेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे सीमाभागातील नेते अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील उपमहापौर रेणू किल्लेकर, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर आदींसह बेळगाव शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन- सम्राट अशोक चौकात हुतात्म्यांना समिती व शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी अभिवादन केले.

Web Title: Greetings to Shiv Sena martyrs in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.