उपमहाराष्ट्र केसरी शंकर तोडकर यांना वाकरेत अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:47+5:302021-03-22T04:21:47+5:30
कोल्हापूर : वाकरे (ता. करवीर) येथे उपमहाराष्ट्र केसरी शंकर तोडकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शंकर तोडकर यांच्या प्रतिमेचे ...
कोल्हापूर : वाकरे (ता. करवीर) येथे उपमहाराष्ट्र केसरी शंकर तोडकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शंकर तोडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पैलवान शंकर तोडकर हायस्कूलचे मार्गदर्शक विठ्ठल पाटील (वस्ताद) यांच्याहस्ते करण्यात आले.
महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात पैलवान शंकर तोडकर यांच्या चटकदार व झटपट कुस्तीचे एक वेगळे वलय असल्याचे संस्थेचे संचालक ए. बी. बिरंजे यांनी सांगितले. मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष के. एच. माने, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, भरत पाटील, हंबीरराव वळके, सरपंच वसंत तोडकर, रघुनाथ कांबळे, शिवाजी तोडकर, भगवान सूर्यवंशी, अशोक बिरंजे आदी उपस्थित होते.
बी. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. जी. डी. लव्हटे यांनी सूत्रसंचालन केेले. आर. के. कांबळे यांनी आभार मानले.
फोटो ओळी :
वाकरे (ता. करवीर) येथे उपमहाराष्ट्र केसरी शंकर तोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विठ्ठल पाटील, सरपंच वसंत तोडकर आदी उपस्थित होते.
(फोटो-२१०३२०२१-कोल-वाकरे)