मलकापूर अर्बन बॅकेला ३ कोटी रुपयाचा ढोबळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:44+5:302021-08-28T04:29:44+5:30

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर अर्बन बँकेला २०२० ते २०२१ या चालू आर्थिक वर्षात ३ कोटी ...

Gross profit of Rs 3 crore to Malkapur Urban Bank | मलकापूर अर्बन बॅकेला ३ कोटी रुपयाचा ढोबळ नफा

मलकापूर अर्बन बॅकेला ३ कोटी रुपयाचा ढोबळ नफा

Next

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर अर्बन बँकेला २०२० ते २०२१ या चालू आर्थिक वर्षात ३ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. निव्वळ नफा ६० लाख रुपये असून सभासदांना १० टक्के लाभांश देणार असल्याची महिती बँकेचे अध्यक्ष अजय लोध यांनी दिली.

बँकेच्या ठेवी ८० कोटींच्या वर असून भागभांडवल २ कोटी रुपये आहे. ३२ कोटी २३ लाख रुपये गुंतवणूक असून ९ कोटी ९६ लाख रुपयांचा गंगाजळ निधी आहे. बँकेचे ११९ कोटी २८ लाख रुपयाचे खेळते भाग भांडवल असून ऑडिट वर्ग अ आहे . सभासद कर्जदारांना अपघाती विम्याची सोय बँकेने केली आहे. सभासदाचा नैसर्गिक मुत्यू झाल्यास त्याचा १ लाख रुपयाचा विमा उतरवता गेला आहे . सर्व शाखांचे सीबीएस पद्धतीने कामकाज सुरू आहे. सभासदांना परदेशातून तत्काळ पैसे बँकेतून काढण्याची सोय असून वीज भरणा केंद्र असल्यामुळे सभासदांना लाईट बिल भरण्याची सोय केली आहे.

Web Title: Gross profit of Rs 3 crore to Malkapur Urban Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.