वाढलेल्या झाडांनी घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:16+5:302021-07-19T04:17:16+5:30
कोल्हापूर : वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनने ऑपरेशन मोकळा श्वास उपक्रम राबवत वाढलेल्या झाडांभाेवतीचे लोखंडी ट्री गार्ड काढून ते नव्या ...
कोल्हापूर : वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनने ऑपरेशन मोकळा श्वास उपक्रम राबवत वाढलेल्या झाडांभाेवतीचे लोखंडी ट्री गार्ड काढून ते नव्या लहान झाडांना लावले. या संस्थेनेच महापालिकेच्या मदतीने हे गार्ड सहा वर्षांपूर्वी लावले होते. रोपांचे संरक्षण करणे हा त्यामागील हेतू होता. या मोहिमेमुळे शहरात रस्त्याच्या दुतर्फा डेरेदार वृक्ष तयार झाले आहेत.
वृक्ष मोठे झाल्यानंतर त्याचे खोड या लोखंडी गार्डमध्ये रुतून बसते. त्याचा वाढीवर परिणाम होतो. तसेच या गार्डमध्ये कचरा टाकून त्याचा कोंडाळा केला जात असल्याने शहराच्या सौदर्यात बाधा येत असल्याचे लक्षात आल्यानंतर वृक्षप्रेमी संस्थेने हे गार्ड काढण्याची माेहीम हाती घेतली. अडीचशे गार्ड काढून ते नव्या लहान झाडांना लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गार्ड तयार करण्याचा खर्चही वाचला असून नव्या रोपांनाही संरक्षण मिळाले आहे.
या मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, सतीश कोरडे, विद्या पाथरे, सविता साळोखे, परितोष उरकुडे, प्रमोद गुरव, अमर पोवार, सचिन पोवान, तात्या गोवावाला, विकास कोंडेकर, अक्षय कांबळे, शैलेश पोवार, यांनी सहभाग घेतला.