सराफ संघाच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्रातूनच टंच काढून घ्या : भरत ओसवाल

By admin | Published: April 29, 2017 03:54 PM2017-04-29T15:54:05+5:302017-04-29T15:54:05+5:30

कोल्हापूर सराफ संघ टंच काढणी केंद्र उदघाटन

For the growth of SAARF team, remove the tincture from the center: Bharat Oswal | सराफ संघाच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्रातूनच टंच काढून घ्या : भरत ओसवाल

सराफ संघाच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्रातूनच टंच काढून घ्या : भरत ओसवाल

Next

लोकमत आॅनलाईन

कोल्हापूर, दि. २९ : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्यावत केलेल्या टंच विभागातूनच सर्व सराफांनी आपल्या सोन्याचा टंच काढून घ्यावा. त्यातून संघाचा उत्पन्न वाढीसाठी उपयोग होईल. असे मत सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी मांडले. ते शनिवारी घाटी दरवाजा येथील संघाच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या टंच केंद्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.


ओसवाल म्हणाले, गेले चार वर्षापासून बंद असलेला टंच विभागाचे मुंबईतील इंडिया बुलियन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (इब्जा) च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने टंच कसा काढला जातो. याविषयी कोल्हापूरातील आपल्या संघाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे प्रशिक्षणास पाठविले होते. त्यातून आपल्या कर्मचाऱ्यांनी काढलेला टंच आणि तेथील टंच यात तसुभरही फरक निघाला नाही. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या आपल्या टंच विभागीच विश्वासार्हता, अचुकता सिद्ध झाली. त्यामुळे येत्या काळात हा टंच विभागातून व्यापाऱ्यांनी टंच काढून घ्यावा. यातून सराफ संघाच्या उत्पन्न वाढीसाठी उपयोग होईल. या टंच केंद्रातून सोन्याची शुद्धता तपासली जाणार आहे. तर संपुर्ण गुजरीमध्ये आमदार फंडातून १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची विनंती करण्यात आली.


यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, जयेश ओसवाल, बाबुराव चव्हाण, प्रकाश बेलेकर, गजानन बिल्ले, संघाचे उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव माणिक जैन, विजय हावळ, सुरेश गायकवाड, जितेंद्र राठोड, किरण गांधी, संजय चोडणकर, निलेश ओसवाल, अनिल पोतदार, महेंद्र ओसवाल,नितीन ओसवाल, रविंद्र राठोड, धर्मपाल जिरगे, शिवाजी पाटील,आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: For the growth of SAARF team, remove the tincture from the center: Bharat Oswal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.