जीएसटी आणि राज्य उत्पादन शुल्कने उद्दिष्ट्य पूर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:45+5:302021-03-16T04:25:45+5:30

कोल्हापूर : वस्तू व सेवा कर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करावे, अशी सूचना वित्त व ...

GST and state excise should meet the objective | जीएसटी आणि राज्य उत्पादन शुल्कने उद्दिष्ट्य पूर्ण करावे

जीएसटी आणि राज्य उत्पादन शुल्कने उद्दिष्ट्य पूर्ण करावे

Next

कोल्हापूर : वस्तू व सेवा कर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करावे, अशी सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सोमवारी केली.

शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त यशवंत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उप महाव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा कोषागार अधिकारी महेश कारंडे, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक संजय माळी उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेला निधी समर्पित होणार नाही. तो खर्च होईल याबाबत दक्षता घ्यावी. विभागांना दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण होईल याबाबत नियोजन करावे. कौशल्य विकास विभागाने ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याबाबत संस्थांना सूचना द्यावी. शीतगृह उभारणी आणि तालुकास्तरावर बाजार समिती निर्माण करण्याबाबत प्रयत्न केला जाईल. त्यासाठी पालकमंत्र्यांशी लवकरच चर्चा करू, असेही ते म्हणाले.

--

फोटो नं १५०३२०२१-कोल-शंभूराजे देसाई

ओळ : कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी विविध विभागाची आढावा बैठक घेतली.

--

Web Title: GST and state excise should meet the objective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.