जीएसटीमुळे वाहनविक्रीत ३५ टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:44 AM2017-08-02T00:44:37+5:302017-08-02T00:44:37+5:30
Next
ठळक मुद्दे२० आॅगस्टपासून जीएसटी रिटर्न भरण्यास सुरुवात होईल
ल ोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शासनाचा ‘जीएसटी’ लागू होऊन महिना उलटला; पण नवीन वाहनखरेदीवर त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवला. वाहनांच्या किमतींबाबत बाजारपेठेत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने ग्राहकांनी वाहनखरेदीकडे तशी पाठच फिरविली. त्यामुळे दुचाकी असो अगर चारचाकी; वाहनांच्या खरेदीमध्ये सुमारे ३० ते ३५ टक्के घट झाली. अखेर ग्राहकांची प्रतीक्षा करीत-करीत वाहनविक्रेत्यांसाठी जुलै महिना सुनासुनाच गेला.‘जीएसटी’ १ जुलैपासून लागू केला. तो लागू झाल्यानंतर नवीन दुचाकी वाहनांच्या किमती घटल्याच्या सुखकारक बातमीने ग्राहकही आनंदला; पण तो वाहनखरेदीसाठी विक्रेत्याकडे शोरूममध्ये गेल्यावर वाहनांच्या किमती ‘जैसे थे’ दिसल्याने ग्राहक गोंधळून गेला. त्यामुळे बाजारपेठेत वाहनांच्या किमतींबाबत ग्राहकांसह विक्रेतेही संभ्रमावस्थेत आहेत. परिणामी सुमारे ३० ते ३५ टक्के ग्राहकांनी नवीन वाहनखरेदीकडे पाठ फिरविली आहे.प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात पावसाळा असल्याने तसा वाहनविक्रीवर परिणाम होतोच. त्यात जुलै महिन्यात जीएसटी लागू झाल्याने त्याचा जादा परिणाम वाहनविक्री व्यवसायावर झाल्याचे दिसून येत आहे. हा कर लागू झाल्यानंतर वाहनांच्या किमती किंचितशा कमी झाल्या; पण तोपर्यंत प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनावर करामध्ये दोन टक्के तसेच विमा कंपन्यांनीही विमा रकमेत काही अंशी वाढ केल्याने वाहनांची कमी झालेली किंमत दिसूनच आलेली नाही. त्यामुळे वाहनांच्या किमतीबाबत ग्राहकांसह विक्रेत्यांतही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती चारचाकी वाहनविक्रीबाबत झालेली आहे.उद्योग-व्यवसायात सावध पावलेवस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होऊन महिना उलटला तरी अजूनही उद्योग-व्यवसाय क्षेत्रात संभ्रमावस्था कायम असल्याने यांतील अनेकजण सावधपणे पावले टाकत आहेत, असे कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले, कापड व्यावसायिक, कृषी उत्पादन प्रक्रिया, आदींसह अजूनही बहुतांश उद्योजक, व्यापारी-व्यावसायिक यांच्यामध्ये ‘जी.एस.टी.’च्या दरांबाबत संभ्रमावस्था कायम आहे. अर्थतज्ज्ञ, चार्टर्ड अकौंटंट, कर सल्लागार यांच्याकडून जी.एस.टी.तील विविध तरतुदी, करांचे दर समजून घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे उद्योजक, व्यावसायिक हे हात राखून काम करीत आहेत. ‘आवश्यकतेप्रमाणे खरेदी आणि मागणीनुसार पुरवठा’ या तत्त्वावर औद्योगिक वसाहतीत काम आणि बाजारपेठेमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू आहे. जी.एस.टी. कौन्सिलची दिल्लीमध्ये दि. ५ आॅगस्टला बैठक होणार आहे. जी.एस.टी. लागू केल्यानंतर या कौन्सिलने देशभरातील विविध उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांच्या संघटनांच्या पदाधिकाºयांची मते जाणून घेऊन अहवाल तयार केला आहे. या बैठकीत अहवालानुसार चर्चा होऊन काही क्षेत्रांतील दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.सोने-चांदी उलाढाल ४० टक्क्यांनी कमी जीएसटी लागू झाल्यापासून कोल्हापुरातील सराफ बाजारातील उलाढाल ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. पूर्वी सोने-चांदी अलंकारांच्या खरेदी-विक्रीवर १.२ टक्के कर होता तो आता तीन टक्के झाल्याने ग्राहकांनीही ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने सोने-चांदी व्यवसायातील जीएसटी प्रणालीवर अजूनही स्पष्ट प्रकटन केलेले नसल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचेच वातावरण आहे. आणखी एक महिना तरी अशी गोंधळाचीच स्थिती राहणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी दिली. अन्नधान्य बाजारात अजूनही संभ्रमब्रँडेड माल कशाला म्हणायचे, ही संकल्पना अजूनही धान्यबाजारात स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे अनेक व्यापाºयांना कुठल्या अन्नधान्यावर किती टक्के जीएसटी लावायचा, हेही अद्याप कळलेले नाही. त्यामुळे एक महिन्यानंतरही अनेकांनी जीएसटी नोंदणी केलेली नाही. अनेक व्यापाºयांनी तर ज्या मालाला जीएसटी लागू आहे, त्या अन्नधान्याची विक्रीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही व्यापाºयांना तर जीएसटी क्रमांक नसलेली बिले माल खरेदी केल्यानंतर माल विकणाºया व्यापाºयांनी दिलेली आहेत. यासह परराज्यांतील काही व्यापाºयांनी ‘अनरजिस्टर्ड ब्रँड- एक्झम्पटेड अंडर जीएसटी’ असे रिमार्क असलेली बिले दिली आहेत. ज्यांचा ‘टिन’ क्रमांक होता, त्यांचा ‘व्हॅट’ क्रमांक ओघाने व्यापाºयांना देण्यात आला. हाच व्हॅट क्रमांक पुढे जीएसटीमध्ये रूपांतरित करण्यात आल्याने ज्यांचे पूर्वी असे क्रमांक होते, त्यांनी जीएसटी क्रमांक काढलेले आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर एक महिन्यात व्यापाºयांमध्ये अशी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. ‘रिअल इस्टेट’मध्ये संभ्रमाचे वातावरण‘जीएसटी’लागू झाल्यानंतर ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रामध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. फ्लॅट आणि वास्तू खरेदीमध्ये अजूनही काही बाबी स्पष्ट झालेल्या नाहीत. त्यामुळे हा संभ्रम असल्याचे सांगण्यात आले. याआधी जे व्यवहार झाले आहेत त्यावर १ टक्का व्हॅट आकारणी आधीच केली गेली आहे तसेच साडेचार टक्के सेवाकर आकारला गेला आहे. आता नवीन सेवाकर बारा टक्क्यांपर्यंत जाईल. त्यातील काही बाबी अजून स्पष्ट व्हायच्या आहेत. त्यामुळे फ्लॅट विक्रीचे व्यवहार करतानाही सध्या सावधपणे पावले टाकली जात आहेत. महिनाभरात १२ हजार जीएसटी क्रमांकांची नोंद देशात १ जुलैपासून एकाचवेळी लागू केलेल्या जीएसटीमध्ये सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतून एकूण १२ हजार व्यापाºयांनी जीएसटी क्रमांकाची नोंदणी केली आहे. यात राज्य जीएसटीकडे सहा हजार आणि केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडे सहा हजार अश्ी एकूण १२ हजार जणांनी नोंदणी केली आहे. २० आॅगस्टपासून जीएसटी रिटर्न भरण्यास सुरुवात होईल. त्यात प्रथम सोपा अर्ज दोन महिन्यांकरिता कार्यालयाने व्यापाºयांसाठी केला आहे. व्यापारी पहिले रिटर्न २० आॅगस्ट, तर दुसरे रिटर्न २० सप्टेंबरला भरतील. यासंबंधी केंद्र सरकारतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांकरिता केंद्रीय निरीक्षक व्ही. राधा यांनी व्यापाºयांंसोबत नुकतीच बैठक घेतली. त्यात त्यांच्या सूचनांची नोंद घेतली व तसा अहवाल त्या केंद्राला सादर करणार आहेत.