अंबाबाईच्या स्वरूपाबद्दल पालकमंत्री संभ्रमित का : सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 08:39 PM2017-08-29T20:39:29+5:302017-08-29T20:41:26+5:30
गारगोटी : साडेतीन शाक्तीपीठापैकी एक करवीर निवासीनी अंबाबाई ही बहुजनांची युध्ददेवता आहे. हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ असताना आमचे पालकमंत्री तिच्या स्वरूपाविषयी संभ्रमित बनावेत यामागे भ्रष्ट पुजा?्यांच्या कृष्णकृत्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न चालू आहेत की काय ?
गारगोटी : साडेतीन शाक्तीपीठापैकी एक करवीर निवासीनी अंबाबाई ही बहुजनांची युध्ददेवता आहे. हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ असताना आमचे पालकमंत्री तिच्या स्वरूपाविषयी संभ्रमित बनावेत यामागे भ्रष्ट पुजा?्यांच्या कृष्णकृत्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न चालू आहेत की काय ? महसूलमंत्री व पालकमंत्री संभ्रमित झाले असून त्यांचा कल पुरोहितांच्या बाजूने का ? असा खडा सवाल जेष्ठ विचारवंत व पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी केला.
ते भाटीवडे (ता. भुदरगड) येथे जयशिवराय तरुण मंडळातर्फे आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश देसाई होते. डॉ. राजीव चव्हाण, राजेंद्र यादव, एम. एस. मोरस्कर प्रमुख उपस्थित होते.
डॉ. देसाई म्हणाले, सदाचार आणि जीवनात नीतिमत्ता पाळणे हा खरा धर्म आहे. अंबाबाई मंदिरातील आहे तेच पुजारी पगारी नेमण्याचा विचार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलून दाखविला आहे. तो आम्हा सर्वांना मान्य नाही. भ्रष्ट पुजाºयांना कायमपणे हाकला ही आमची मागणी असून सर्वोच्च न्यायालयाने पंढरपूर मंदिराबद्दल दिलेला निकाल सर्वच मंदिरांना लागू होतो. उठसुठ अध्यादेश काढणारे मुख्यमंत्री अंबाबाई मंदिराचा अध्यादेश काढण्यास का कचरतात हेच समजत नाही.
डॉ. राजीव चव्हाण यांनी शिवपोवाडा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केला. यावेळी पांडुरंग देसाई, प्रकाश देसाई, अजित कांबळे,
शिवकुमार शेट्टी, मानसिंग देसाई, अमित मोरस्कर, प्रकाश माणगांवकर, दिलीप माणगावकर, पांडुरंग देसाई, मानसिंग देसाई, बाजीराव नाटले, मनोहर देसाई, अमित साळस्कर, दशरथ माणगावकर, महादेव गुरव, प्रकाश कडव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक श्रीकांत माणगावकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश माणगावकर यांनी केले. प्रकाश कडव यांनी आभार मानले.