आर्थिक अडचणींमुळे खेळाडूंची प्रगती खुंटू देणार नाही --पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:00 PM2018-01-01T23:00:33+5:302018-01-01T23:01:09+5:30

कोल्हापूर : आर्थिक स्थितीमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची प्रगती खुंटणार नाही

Guardian Minister Chandrakant Dada Patil's assurance that financial problems will not ruin players' progress | आर्थिक अडचणींमुळे खेळाडूंची प्रगती खुंटू देणार नाही --पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

आर्थिक अडचणींमुळे खेळाडूंची प्रगती खुंटू देणार नाही --पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

googlenewsNext

कोल्हापूर : आर्थिक स्थितीमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची प्रगती खुंटणार नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

कणेरीतील सिद्धगिरी संस्थानतर्फे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्या चेतना उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी सिद्धगिरी संस्थान येथे भेट दिली यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील यांनी विद्या चेतना प्रकल्पांतर्गत जिल्हाभर सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. त्यात अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

यावेळी त्यांनी क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाºया मुलांचा अधिक विकसित करण्यासाठी त्यांच्यावर विशेष लक्ष द्या, ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड मोठी ऊर्जा व क्षमता असते. आर्थिक अडचण आहे म्हणून कोणत्याही गुणवंत खेळाडूची प्रगती खुंटणार नाही. याबाबत लक्षपूर्वक प्रयत्न करण्यात येतील. विद्या चेतना प्रकल्पांतर्गत काम करणाºयांना विमा पॉलिसीचे संरक्षण देण्यात येईल.’ असे त्यांनी सांगितले.

नव्याने सुरू करण्यात येणाºया सिद्धगिरी प्रज्ञा विकास या दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन महिने विशेष प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात येणाºया उपक्रमामध्ये यावर्षी १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा खर्चासाठीही मदत करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

सिद्धगिरी संस्थान अंतर्गतच सुशिक्षित बेरोजगार शेतकºयांना शेडनेटद्वारे सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी प्रति ५ गुंठ्याला २ लाख ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. या शेतकºयांना सेंद्रीय शेतीबाबतचे सर्व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला दराची हमी देण्यात येईल. शेतकºयांनी होणाºया फायद्यातून दिलेल्या अर्थसहाय्यापैकी अर्धी रक्कम परत केल्यानंतर अन्य शेतकºयांना याच पद्धतीने मदत करण्यात येईल. या उपक्रमाची यशस्विता सिद्ध झाल्यानंतर हा उपक्रम मराठवाड्यात राबविला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 

 

Web Title: Guardian Minister Chandrakant Dada Patil's assurance that financial problems will not ruin players' progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.