Oxygen Shortage: तिकडे पालकमंत्री ऑक्सिजन पुरवठ्यावर बोलले, इकडे ऑक्सिजनअभावी रुग्णाने प्राण सोडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 12:51 PM2021-05-01T12:51:31+5:302021-05-01T13:02:33+5:30

Oxygen Shortage: कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल बैठक घेतली; त्याचवेळी जिल्ह्यात एका रुग्णाचा ऑक्सिजन नसल्यानं मृत्यू

guardian minister satej patil ensures oxygen supply corona patient dies due to Oxygen Shortage | Oxygen Shortage: तिकडे पालकमंत्री ऑक्सिजन पुरवठ्यावर बोलले, इकडे ऑक्सिजनअभावी रुग्णाने प्राण सोडले!

Oxygen Shortage: तिकडे पालकमंत्री ऑक्सिजन पुरवठ्यावर बोलले, इकडे ऑक्सिजनअभावी रुग्णाने प्राण सोडले!

Next

कोल्हापूर: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. लॉकडाऊन लागू असूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाही. राज्यात दररोज कोरोनाचे ६० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. वेळेवर उपचार मिळत नसल्यानं अनेक रुग्णांना हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूरमध्ये एका रुग्णानं ऑक्सिजनअभावी प्राण सोडल्याची घटना घडली आहे. एकीकडे पालकमंत्री सतेज पाटील जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असा विश्वास व्यक्त करताना दुसरीकडे ऑक्सिजनअभावी रुग्णाची प्राणज्योत मालवली.

कोवॅक्सिननं भरलेला कंटेनर बेवारस स्थितीत सापडला; चालक-वाहक दोघेही गायब

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केलं. ध्वजारोहण केल्यानंतर सतेज पाटील थेट जिल्हाधिकारी कक्षात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. दत्तात्रय कवितके, प्रांताधिकारी वैभव नावाडकर उपस्थित होते.

VIDEO: माझी आई मरेल हो...! मुलगा ओरडत राहिला; पोलिसांनी VIPसाठी ऑक्सिजन सिलिंडर हिसकावला

पालकमंत्री सतेज पाटील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत असतानाच एका रुग्णानं ऑक्सिजनअभावी प्राण सोडले. सर्जेराव पांडुरंग कुरणे असं या व्यक्तीचं नाव असून त्याचं वय ४१ वर्षे होतं. रंकाळा टॉवर परिसरातील स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या महालक्ष्मी रुग्णालयात सर्जेराव यांच्यावर उपचार सुरू होते. २६ एप्रिलला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: guardian minister satej patil ensures oxygen supply corona patient dies due to Oxygen Shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.