पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 11:20 AM2022-01-27T11:20:25+5:302022-01-27T11:21:00+5:30
प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती.
कोल्हापूर : राज्याचे गृहराज्य मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती. तर याआधीही अनेक शासकीय बैठका तसेच विविध विकास कामाच्या उद्धाटनालाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच वातावरणात होत असलेल्या बदलामुळे साथीच्या आजारातही वाढ होत आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच कोरोना रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे.