पालकमंत्री उद्या साधणार शिक्षक, प्राध्यापकांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:36+5:302021-05-29T04:18:36+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी ० ते १८ वयोगटातील बालके, शिक्षक, पालकांशी उद्या रविवारी सकाळी १० वाजता पालकमंत्री ...
कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी ० ते १८ वयोगटातील बालके, शिक्षक, पालकांशी उद्या रविवारी सकाळी १० वाजता पालकमंत्री सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई व टास्क फोर्सचे प्रमुख संवाद साधणार आहेत. तरी सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी https://youtu.be/BY20UBRIHPY या यु ट्युब लिंकद्वारे मार्गदर्शन सत्रासाठी ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुले व पालकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी आमदार जयंत आसगांवकर यांच्या संकल्पनेतून कोरोना : बालक जागृती अभियान राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत गेल्या वर्षभरापासून ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांशी जोडले गेलेले शिक्षक विद्यार्थ्यांना कोरोनापासून बचाव कसा करावा याचे मार्गदर्शन करणार आहेत. या अभियानाची सविस्तर माहिती व त्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी ही ऑनलाईन बैठक घेण्यात येत आहे.
----