‘धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती...!’

By Admin | Published: June 21, 2016 01:06 AM2016-06-21T01:06:14+5:302016-06-21T01:16:33+5:30

पुरोगामींची विचारणा : गोविंद पानसरे स्मृतिदिनानिमित्त ‘निर्भय बनो’ फेरी

'The guards of Dharma, how can stop the speed ...!' | ‘धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती...!’

‘धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती...!’

googlenewsNext

कोल्हापूर : ‘संपविला देह जरी...संपणार नाही मती...धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती...!’ असा आवाज सोमवारी कोल्हापुरात निघालेल्या पुरोगामी कार्यकर्त्यांच्या ‘निर्भय बनो’ फेरीमध्ये दुमदुमला. निमित्त होते, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ निघालेल्या निषेध फेरीचे. दरमहा शिवाजी विद्यापीठात निघणारी ही फेरी प्रथमच पानसरे यांच्या निवासस्थानापासून शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आली. त्यामध्ये सामाजिक चळवळीतील लोक मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभागी झाले.
सागरमाळ परिसरातील पानसरे यांच्या घरापासून सकाळी सात वाजता हे फेरी सुरू झाली. ती यादवनगर, गोखले कॉलेज, सावित्रीबाई फुले रुग्णालय,आझाद चौकातून बिंदू चौकामार्गे शिवाजी चौकात आली. या दरम्यान ‘लाल सलाम...लाल सलाम... गोविंद पानसरे को लाल सलाम...’,‘लढेंगे तो जितेंगे...’अशा घोषणा देण्यात आल्या. रणजित कांबळे, कृष्णात कोरे आदींनी चळवळींतील गाणी गात फेरीमध्ये चैतन्य आणले. पुरोगामी विचारांचा हा जागर ऐकून शहरवासीयांचीही उत्सुकता ताणली. ही फेरी शिवाजी चौकात आल्यावर तिथे पानसरे-दाभोलकर व कलबुर्गी यांचे स्मरण करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. मेघा पानसरे यांनी या हत्याप्रकरणी सध्या सुरू असलेल्या तपासाबद्दल माहिती दिली. पानसरे हत्येचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे; परंतु त्यांच्याकडून अजूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. राज्य सरकारने ती तयारी न दर्शविल्यास
दि. २३ जूनच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाकडे ही मागणी करणार असल्याचे मेघा पानसरे यांनी सांगितले. या तिन्ही हत्यांमध्ये आम्ही सुरुवातीपासून जे म्हणत होतो, त्याच सनातन संस्था व हिंदू जनजागरण समितीसारख्या संस्थांचा सहभाग स्पष्ट होत आहे; परंतु पोलिसांना त्याबद्दल माहिती देऊनही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप श्रीमती पानसरे यांनी केला.
यावेळी शिवशाहीर राजू राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा म्हटला. रसिया पडळकर हिने ‘इसलिय हम राह संघर्ष की चुने...’हे गाणे म्हटले. फेरीमध्ये दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, सुरेश शिपूरकर, नामदेव गावडे, उदय नारकर, एस. बी. पाटील,धनाजीराव जाधव, प्रा. रणधीर शिंदे, डॉ. चैतन्य शिपूरकर, निहाल शिपूरकर, सुजाता म्हेत्रे, प्रा. विलास पवार, छाया पवार, तनूजा शिपूरकर, सीमा पाटील, उमेश पानसरे, उमेश सूर्यवंशी, रमेश वडणगेकर, आर्किटेक्ट जीवन बोडके, सतीश पाटील,
आदित्य खेबूडकर आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)

Web Title: 'The guards of Dharma, how can stop the speed ...!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.