‘नेशन फर्स्ट’तर्फे नागरिक त्व कायद्याबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 02:39 PM2019-12-25T14:39:55+5:302019-12-25T14:40:44+5:30
कोल्हापूर येथील 'नेशन फर्स्ट' तर्फे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दैवज्ञ बोर्डिंग येथे अॅड. प्रवीण देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी देशपांडे यांनी या कायद्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. हा कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माविरोधामध्ये नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर : येथील 'नेशन फर्स्ट' तर्फे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दैवज्ञ बोर्डिंग येथे अॅड. प्रवीण देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी देशपांडे यांनी या कायद्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. हा कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माविरोधामध्ये नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमानंतर दैवज्ञ बोर्डिंग ते शिवाजी पेठ अशी महाद्वार रोडवरून रॅली काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यकर्त्यांसमवेत यावेळी सामान्य नागरिकही रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या हस्ते भारतीय संविधान पूजन आणि भारतमाता पूजन करण्यात आले. यावेळी अॅड. अनुजा धरणगावकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर शहर संघचालक सूर्यकिरण वाघ आणि ‘नेशन फर्स्ट’चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.