पंडेवाडी येथे कृषीकन्येकडून बीजप्रक्रियेबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:19 AM2020-12-09T04:19:12+5:302020-12-09T04:19:12+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद असताना छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस, ओरोस (जि. सिंधुदुर्ग) या महाविद्यालयातील ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद असताना छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस, ओरोस (जि. सिंधुदुर्ग) या महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात शिकणारी कृषिकन्या अमृता यशवंत चौगले हिने पंडेवाडी (ता. राधानगरी) येथील शेतकऱ्यांना कोरोना संसर्ग प्रतिबंधक नियमांचे पालन करत ''बीजप्रक्रिया''बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बीजप्रक्रियेसाठी मक्का बियाण्याची निवड करण्यात आली. एक किलो मक्का बियाणे घेऊन त्यामध्ये बुरशीनाशक थिरम २-३ ग्रॅम मिसळून ते शेतकऱ्यांना पेरणीसाठी कसे उपयोगात येईल याचे मार्गर्शन केले तसेच बीजप्रक्रियेचे महत्त्व आणि फायदे याचे मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियेबाबत विचारलेल्या शंकांचे निरसनदेखील करण्यात आले. बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकवेळी कोरोना विषाणूबाबत प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात आले होते. यावेळी साताप्पा पाटील, संभाजी पाटील, रामचंद्र बेलेकर, रंजना पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.
पंडेवाडी : येथे शेतकऱ्यांना ''बीजप्रक्रिया''बाबत मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाची कृषीकन्या अमृता चौगले.