झेंडा फडकविण्याचे मार्गदर्शन; उत्तूर विद्यालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:07 AM2018-08-13T01:07:18+5:302018-08-13T01:07:21+5:30

Guide to flagging; Uttur Vidyalaya Program | झेंडा फडकविण्याचे मार्गदर्शन; उत्तूर विद्यालयाचा उपक्रम

झेंडा फडकविण्याचे मार्गदर्शन; उत्तूर विद्यालयाचा उपक्रम

Next

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकविणे आणि तो विशिष्ट पद्धतीने बांधणे हे मोठे जबाबदारीचे काम. यात हलगर्जीपणा झाला किंवा त्याचे संकेत पाळले गेले नाहीत तर तो गुन्हा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर उत्तूर (ता. आजरा) येथील विद्यार्थीच गावातील सर्व ठिकाणांचे झेंडे नीटपणे फडकविण्याची काळजी घेतात. गेली २0 वर्षे हा उपक्रम सुरू आहे.
उत्तूर येथील आंतरभारती शिक्षण संस्थेचे सचिव ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांना २0 वर्षांपूर्वी असे जाणवले की, झेंडावंदन करीत असताना नेमक्या नियमांची माहिती नसणे, झेंडा कधीतरी काढला जात असल्याने तो न उलगडणे अशा अडचणी येतात. याबाबत त्यांनी उत्तूर विद्यालयातील विद्यार्थ्यांनाच झेंडा फडकवणे, बांधणे याबाबत प्रशिक्षण दिले आणि हीच मुले सर्व ठिकाणी जाऊन झेंडा फडकवू लागली, बांधू लागली.
प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनाच्या आठ दिवस आधी हे प्रशिक्षण सुरू होते. यानंतर १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता २0 मुलांचा एक गट असे १६ गट गावातील झेंडावंदन केले जाणार आहे, त्या ठिकाणी जातात.
सवयीनुसार संयोजक संस्थांनी साहित्य तयार ठेवलेले असते. प्रशिक्षणाप्रमाणे हे विद्यार्थी सेवा संस्था, दूध संस्था, तरुण मंडळे या ठिकाणी झेंडा फडकवून, बांधून पुन्हा ग्रामपंचायतीच्या ठिकाणी असणाऱ्या मुख्य झेंडावंदनासाठी एकत्र येतात. त्यामुळे त्या-त्या संस्थांचे शिपाई, कार्यकर्ते यांनाही आता या विद्यार्थ्यांची सवय झाली आहे.

Web Title: Guide to flagging; Uttur Vidyalaya Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.