वारणा समूहाचे मार्गदर्शक डॉ. भाऊसाहेब राजाराम गुळवणी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 08:24 PM2020-08-03T20:24:53+5:302020-08-03T20:25:12+5:30

वारणा परिसराचे ऋषीतुल्य, मार्गदर्शक स. आ. तथा मामासाहेब गुळवणी, वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्यासोबत सहकारातील विकासाचे धडे गिरवले.

The guide of Warna Group, Dr. Bhausaheb Rajaram Gulwani passed away | वारणा समूहाचे मार्गदर्शक डॉ. भाऊसाहेब राजाराम गुळवणी यांचे निधन

वारणा समूहाचे मार्गदर्शक डॉ. भाऊसाहेब राजाराम गुळवणी यांचे निधन

googlenewsNext

कोल्हापूरः वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या जडणघडणीत मोठे योगदान ठरलेले आणि वारणा परिसरातील अध्यात्मिक ऋषीतुल्य, वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब राजाराम गुळवणी (८७) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण वारणा परिसरावर शोककळा पसरली. वारणा परिसराचे ऋषीतुल्य, मार्गदर्शक स. आ. तथा मामासाहेब गुळवणी, वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्यासोबत सहकारातील विकासाचे धडे गिरवले. त्यामुळे वारणेच्या एकूण प्रवासात डॉ. गुळवणी मामा यांचा सिंहाचा वाटा होता.

ऋषितुल्य मामासाहेब यांचा आध्यात्मिक विचारांचा वारसा देखील त्यांनी चालविला. वारणेतील प्रत्येक शुभकार्याचा प्रारंभ मामासाहेब यांच्या हस्ते केला जात होता. त्यामुळे वारणा समूहाचे ते आधारवड होते. वारणा दूध संघाला त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे त्यांचा ५ मार्च १९३३ ला जन्म झाला. ते नेबापूर (ता.पन्हाळा) वास्तव्यास होते. वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर असलेले मामासाहेब यांनी पन्हाळा, कळे येथे शिक्षण संस्थांची स्थापना केली.

अभ्यासू व्यक्तीमत्व, स्मितहास्य, सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेले भाऊसाहेब लोकांचे जीवनदायी होते. वारणा दूध संघामध्ये १९९० पासून संचालक म्हणून कार्यास सुरुवात केली. २००५ ते २०१६ मध्ये अध्यक्ष, १९९६ ते २००५ ,व २०१५ पासून उपाध्यक्ष , आज अखेर उपाध्यक्ष होते. पन्हाळा शिक्षण संस्थेसह वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळाचे अध्यक्ष तसेच महात्मा गांधी मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त, वारणा अँग्रोचे संचालक, तळसंदे येथील नवजीवन उद्योग संस्था समूहातील संस्थांचे संस्थापक होते. वारणा दूध संघाबरोबरच वारणा परिसरातील संस्थांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: The guide of Warna Group, Dr. Bhausaheb Rajaram Gulwani passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.