लोकसहभागातून एक लाख वृक्षारोपणाचा प्रयोग राज्यासाठी दिशादर्शक
By admin | Published: July 1, 2017 10:17 PM2017-07-01T22:17:05+5:302017-07-01T22:17:05+5:30
एकाच ठिकाणी एक लाख वृक्षारोपणाचा प्रयोग राज्यात प्रथमच होत असून, तो राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 1 - भुयेवाडी येथे लोकसहभागातून राजर्षी छत्रपती शाहू प्रेरित पारंपरिक जंगली वृक्ष व जंगल पुर्ननिर्माण अभियानांतर्गत एकाच ठिकाणी एक लाख वृक्षारोपणाचा प्रयोग राज्यात प्रथमच होत असून, तो राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे केले.
लोकसहभागातून राजर्षी छत्रपती शाहू प्रेरित ‘पारंपरिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियान २०१६’ सामाजिक कार्यकर्ते निवास साळोखे यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आले आहे. यावर्षीच्या प्रारंभी १ लाख २५ हजार जंगली झाडांच्या रोपांची निर्मिती केली. त्यातूनच भुयेवाडी (ता. करवीर) येथे विविध सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक संस्था यांच्या सहभागाने एक हजार रोपे शनिवारी लावण्यात आली.
नजीकच्या काळात एक कोटी जंगली वृक्षरोपांची निर्मिर्ती करून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ती रोपे लावणे, सांभाळणे, ती मोठी करणे व घनदाट जंगल साकारणे हे उपक्रम या अभियानांर्गत राबविण्यात येणार आहेत. या अभियानाच्या प्रारंभप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.