गनिमी काव्याचे राजकारण करणार : सतेज पाटील यांची राजकीय टोलेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 11:51 IST2019-09-04T11:44:54+5:302019-09-04T11:51:26+5:30
राधानगरी रोड वरील इराणी खणीनजीकच्या चौकात उभारण्यात आलेल्या हातात तलवार धरलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मृती स्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते.

इराणी खणीनजीक राधानगरी रोडवर हातात तलवार धरलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मृती स्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, महापौर माधवी गवंडी, डॉ. जयसिंगराव पवार, उपमहापौर भूपाल शेटे, उदयसिंह घोरपडे, नगरसेवक शारंगधर देशमुख उपस्थित होते.
कळंबा : हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी तसेच शत्रूला नामोहरम करण्यासाठी संताजी घोरपडे यांनी गनिमीकावा युध्द पद्धत वापरली. येत्या काळात आपणही जिल्ह्यात गनिमी काव्याचे राजकारण करणार हे निश्चित असून संताजी-धनाजीची धास्ती घेतलेल्या मोगलांप्रमाणे राजकीय शत्रूंना आता सर्वत्र आम्हीच दिसत आहोत अशी राजकीय टोलेबाजी आमदार सतेज पाटील यांनी केली.
राधानगरी रोड वरील इराणी खणीनजीकच्या चौकात उभारलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मृती स्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते.
संताजी घोरपडे यांच्या स्तंभाच्या उभारणीमुळे त्यांच्या कार्याच्या प्रेरणादायी इतिहासास उजाळा मिळाला असून त्यांच्या शौर्याचा आदर्श युवा पिढीस मार्गदर्शक ठरेल असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.
संताजी घोरपडे यांचे वंशज उदयसिंह घोरपडे यांनी श्रेष्ठ सेनानीच्या कार्याचा यथार्थ गौरव झाल्याचे मत व्यक्त केले. इतिकासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या शौर्याचा इतिहास यावेळी विशद केला.
प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी केले. यावेळी महापौर माधवी गवंडी, उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेविका दीपा मगदूम, प्रतीक्षा पाटील, नगरसेवक अभिजित चव्हाण, तौफिक मुल्लानी, अर्जुन माने यांसह मधुकर रामाने, वसंतराव देशमुख, प्रमिला देशमुख यांसह मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.