गुजरी सराफ दूकानातील तिजोरी मिरजेत सापडली, पुणे-पिंपरी येथील चोरट्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 04:36 PM2019-02-08T16:36:42+5:302019-02-08T16:38:59+5:30

महाव्दार रोड व गुजरी परिसरात दोन सराफ दुकाने फोडून चोरट्यांनी २२ लाख किंमतीचे ६० तोळे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. यावेळी प्रमोद कोलेकर यांच्या दुकानातून लंपास केलेली तिजोरी मिरज फाटा येथे रस्त्याकडेला रिकाम्या अवस्थेत पोलीसांना मिळून आली. चोरट्यांनी शाहुपूरी येथून व्हॅन चोरुन तिचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

Gujari Saraf's shop found in the sealed enclosure, the thieves of Pune-Pimpri were involved | गुजरी सराफ दूकानातील तिजोरी मिरजेत सापडली, पुणे-पिंपरी येथील चोरट्यांचा समावेश

गुजरी सराफ दूकानातील तिजोरी मिरजेत सापडली, पुणे-पिंपरी येथील चोरट्यांचा समावेश

Next
ठळक मुद्देगुजरी सराफ दूकानातील तिजोरी मिरजेत सापडली, पुणे-पिंपरी येथील चोरट्यांचा समावेशशाहुपूरीतील चोरीच्या व्हॅनचा वापर

कोल्हापूर : महाव्दार रोड व गुजरी परिसरात दोन सराफ दुकाने फोडून चोरट्यांनी २२ लाख किंमतीचे ६० तोळे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. यावेळी प्रमोद कोलेकर यांच्या दुकानातून लंपास केलेली तिजोरी मिरज फाटा येथे रस्त्याकडेला रिकाम्या अवस्थेत पोलीसांना मिळून आली. चोरट्यांनी शाहुपूरी येथून व्हॅन चोरुन तिचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

गुजरीतील दरोड्याचा तपास करताना तिघे चोरटे व्हॅनमधून आल्याचे रोडवरील एका दूकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. कोलेकर सराफ यांच्या दूकानातील दागिन्यांची तिजोरी चोरट्यांनी लंपास केली होती. तिजोरीत सुमारे १८ लाख किंमतीचे दागिने होते. व्हॅनचा शोध घेतला असता चोरट्यांनी शाहूपुरी येथील एका घरासमोरुन चोरी करुन ते गुजरीत आले.

तेथून ते स्टेशन रोडने सांगली फाटा येथून मिरजेकडे गेल्याचे दिसून आले. त्यानुसार शोध घेतला असता मिरज फाटा येथे रिकामी तिजोरी पोलीसांना मिळून आली. महार्गाच्या दिशेने चोरटे निघून गेल्याने ते पुणे-पिंपरी येथील असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. या परिसरातील रेकॉर्डवरील चोरट्यांची पोलीस माहिती घेत आहेत.

दोन्ही दरोड्यांची मोडस एकच

गुजरी दरोड्यातील चोरट्यांनी मिरज फाटा येथे तिजोरी टाकून पुण्याला पलायन केल्याची शक्यता आहे. कळे दरोड्यातील टोळीने वैभववाडी मार्गे गोव्याकडे पलायन केल्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही दरोड्यांची मोडस एकच असल्याने दोन टोळ्या एकत्रित कार्यरत असण्याची संशय पोलीसांना आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या टोळीच्या मार्गावर आहे.

 

Web Title: Gujari Saraf's shop found in the sealed enclosure, the thieves of Pune-Pimpri were involved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.