गुणे यांच्यामुळे कोल्हापुरची दातृत्वाची ओळख ठळक :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:41+5:302021-08-19T04:28:41+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. देशभरात कोल्हापूरच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख दिलदार, दिलखुलास, रांगडे ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. देशभरात कोल्हापूरच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख दिलदार, दिलखुलास, रांगडे व्यक्तिमत्त्व अशी आहे. देशभक्ती, मदतकार्य अशा जिव्हाळ्याच्या सर्वच गोष्टींत कोल्हापूर हे पुरेपूर आणि भरपूर देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही कोल्हापूरची ओळख डॉ. प्रकाश गुणे यांनी ठळक केली, असे गौरवोद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले.
दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी कोल्हापुरातील प्रसिद्ध युरोओलॉजिस्ट डॉ. प्रकाश गुणे आणि कुटुंबीयांनी भारतीय सेनादलाला तब्बल एक कोटी रुपयांची देणगी नवी दिल्ली येथे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे सुपुर्द केली. त्यांच्या या दातृत्वाबद्दल पाटील यांनी बुधवारी गुणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ‘अभिमान कोल्हापूरचा’ सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, डॉ. राहुल गुणे उपस्थित होते.
१८०८२०२१ कोल चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी डॉ. प्रकाश गुणे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी राहुल चिकोडे उपस्थित होते.