कबनूर ग्रामपंचायतीच्यावतीने गुणीजनांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:23+5:302021-09-04T04:28:23+5:30
कबनूर : विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व संपादन केलेल्या गुणीजनांचा सत्कार येथील ग्रामपंचायत सभागृहात ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच शोभा पोवार यांनी केला. ...
कबनूर : विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व संपादन केलेल्या गुणीजनांचा सत्कार येथील ग्रामपंचायत सभागृहात ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच शोभा पोवार यांनी केला.
जागतिक शांती सदभाव संमेलनासाठीचे निमंत्रित एन. एन. काझी, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात मागासवर्गीय गुणवत्ता यादीत प्रथम आलेली मिताली राजाराम इंगळे, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला पै. यश पाटील, मर्दानी खेळातील विक्रमवीर ओंकार हुपरे, राष्ट्रीय खेळाडू प्रथमेश क्षीरसागर, कोरोना काळात मदत केलेले राजू शिरगुप्पे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात माजी सरपंच मधुकर मणेरे, बी. डी. पाटील, अशोकराव पाटील, प्रा. रवींद्र पाटील तसेच सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच सुधीर पाटील यांनी स्वागत केले. यावेळी जयकुमार कडाप्पा, बबन केटकाळे, सुधीर लिगाडे, प्रवीण जाधव, समीर जमादार, सैफ मुजावर, अर्चना पाटील, रजनी गुरव, रोहिणी स्वामी, संजय कट्टी, किशोर पाटील, शिवगोंडा पाटील, बबनराव इंगळे, राहुल कांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
०३०९२०२१-आयसीएच-०५
कबनूर (ता. हातकणंगले) येथील गुणीजनांचा सरपंच शोभा पोवार यांनी सत्कार केला. यावेळी उपसरपंच सुधीर पाटील, अशोक पाटील, मधुकर मणेरे, आदी उपस्थित होते.