पूरबाधित शेतीसाठी गुंठ्यास एक हजारप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:30+5:302021-08-23T04:25:30+5:30

शिये: नदीकाठची शेती शंभर टक्के बाधित धरून पूरबाधित शेतीसाठी गुंठ्यास एक हजारप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी ...

Guntha should get compensation of one thousand rupees for flood affected agriculture | पूरबाधित शेतीसाठी गुंठ्यास एक हजारप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी

पूरबाधित शेतीसाठी गुंठ्यास एक हजारप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी

Next

शिये:

नदीकाठची शेती शंभर टक्के बाधित धरून पूरबाधित शेतीसाठी गुंठ्यास एक हजारप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. शिये, ता. करवीर येथील पूरबाधित कुटुंबांना मदत वाटपप्रसंगी ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, सरपंच रेखा जाधव प्रमुख उपस्थित होते.

सोसायटीकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहेत. महापुरामुळे शेती पिकाचे नुकसान झाले असल्याने पूरबाधित शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेणे गरजेचे असल्याचे नरके म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नरके यांनी सांगितले.

प्रास्ताविक निवास पाटील यांनी केले. आभार रणजित कदम यांनी मानले. यावेळी उपसरपंच शिवराम गाडवे, सतीश कुरणे, पांडुरंग पाटील, शीतल मगदूम, विलास गुरव, तेजस्विनी पाटील, किरण चौगले, विश्वास पाटील, जालिंदर चव्हाण, प्रवीण चौगले, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.

फोटो

शिये येथील पूरग्रस्तांना मदत किट वाटपप्रसंगी माजी आमदार चंद्रदीप नरके, सरपंच रेखा जाधव, बाजीराव पाटील, रणजित कदम आदी मान्यवर

Web Title: Guntha should get compensation of one thousand rupees for flood affected agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.