संकटकाळात गुरुदत्तचे कार्य गौरवास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:25 AM2021-07-31T04:25:44+5:302021-07-31T04:25:44+5:30
जयसिंगपूर : संकटाच्या काळात आपत्तीग्रस्तांना सेवाभावी वृत्तीने गुरुदत्त शुगर्सने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. महापुराच्या काळात शिरोळ तालुक्यातील ...
जयसिंगपूर :
संकटाच्या काळात आपत्तीग्रस्तांना सेवाभावी वृत्तीने गुरुदत्त शुगर्सने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. महापुराच्या काळात शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील पूरग्रस्तांना निवारा मिळवून देत त्यांचे दुःख भार हलके करण्याचे काम त्यांच्या हातून घडत आहे. ही बाब गौरवास्पद आहे, असे उदगार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयसिंगपूर येथे काढले.
कोल्हापूर जिल्ह्यात पूर पाहणीवेळी जयसिंगपूर येथील निवासस्थानी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांची भेेेट घेऊन फडणवीस यांनी सत्कार केला.
यावेळी ते म्हणाले, शिरोळ तालुक्यावर महापुराचे संकट आले, अशा काळात तालुक्यातील विविध गावातील पूरग्रस्तांसह त्यांच्या जनावरांना कारखान्यात निवारा देत अगदी कुटुंबाप्रमाणे त्यांची सेवा केली जात आहे. या कामाचा शासकीय मोबदलाही माधवराव घाटगे यांनी नाकारला हे त्यांचे मोठेपण आहे. 'गुरुदत्त'मुळे प्रशासनाला मोठा आधार झाला आहे.
'गुरुदत्त'च्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांना उभारी देण्याचं काम केले आहे. आपत्तीच्या काळात यापुढेही सेवा करत राहू, अशी ग्वाही घाटगे यांनी दिली.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, 'गुरुदत्त'चे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, राजवर्धन निंबाळकर, डॉ. अशोकराव माने, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, अरुण इंगवले, सुरेश पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ : जयसिगपूर येथे गुरुदत्त शुगर्स'चे अध्यक्ष माधवराव घाटगे यांचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. यावेळी प्रवीण दरेकर, राहुल घाटगे, धीरज घाटगे.
जयसिंगपूर येथे
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.यावेळी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष
माधवराव घाटगे,प्रवीण दरेकर गुरुदत्त'चे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे उपस्थित होते.