‘गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव’ पुरस्कारांचे शनिवारी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:49+5:302021-02-09T04:25:49+5:30

कोल्हापूर : सांगरूळ शिक्षण संस्थेचे संस्थापक डी. डी. आसगावकर यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि. १३) ‘गुरुवर्य डी. ...

‘Guruvarya d. D. Asgaonkar Gaurav's awards distributed on Saturday | ‘गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव’ पुरस्कारांचे शनिवारी वितरण

‘गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव’ पुरस्कारांचे शनिवारी वितरण

Next

कोल्हापूर : सांगरूळ शिक्षण संस्थेचे संस्थापक डी. डी. आसगावकर यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि. १३) ‘गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव’ पुरस्कारांचे वितरण सकाळी साडेअकरा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. यंदा इचलकरंजीतील ना. बा. एज्युकेशन सोसायटीसह १४ शिक्षक, कर्मचाऱ्यांना पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराने सन्मानित केले जाईल, अशी माहिती आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुडित्रे येथील गुरुवर्य डी. डी. आसगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टने गेल्या दोन वर्षांपूर्वी या पुरस्कारांची सुरुवात केली. यावर्षी प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे (महावीर महाविद्यालय), मुख्याध्यापिका सीमा सांगरूळकर (आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल), मुख्याध्यापक सागर कुमार चुडाप्पा (खोतवाडी हायस्कूल), मुख्याध्यापक अनिलकुमार गुरव (न्यू इंग्लिश स्कूल बहिरेश्वर), शिक्षक बाबूराव पाटील (श्री पार्वती शंकर विद्यालय उत्तूर), सागर वातकर (उषाराजे हायस्कूल), सुधीर कांबळे (न्यू इंग्लिश स्कूल कुरूकली), गीता मुरकुटे (महात्मा फुले विद्यालय कार्वे), बाबासाहेब कुंभार (विलासराव शामराव तळप-पाटील माध्यमिक विद्यालय गोगवे), शिवानंद घस्ती (न्यू इंग्लिश स्कूल नूल), अमित शिंत्रे (श्री काडसिध्देश्वर हायस्कूल), स्वाती पंडित (लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल जयसिंगपूर), विलास आरेकर (भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा विद्यामंदिर खानापूर), वरिष्ठ लिपिक अभिजित गायकवाड (श्री. बळवंतराव यादव हायस्कूल पेठवडगाव) यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे आमदार आसगावकर यांनी सांगितले.

यावेळी सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, सहसचिव डी. एन. कुलकर्णी, संचालक मदन पाटील, निवृत्ती चाबूक, सदाशिव खाडे, बी. आर. नाळे, आनंदा कासोटे, एस. पी. चौगले उपस्थित होते.

Web Title: ‘Guruvarya d. D. Asgaonkar Gaurav's awards distributed on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.