उद्यमनगरात ६० हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:21 AM2021-01-04T04:21:35+5:302021-01-04T04:21:35+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवाजी उद्ममनगर परिसरात दुचाकीवरुन गुटखा घेऊन जाणाऱ्या दोघांना ...

Gutka worth Rs 60,000 seized in Udyamnagar | उद्यमनगरात ६० हजारांचा गुटखा जप्त

उद्यमनगरात ६० हजारांचा गुटखा जप्त

Next

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवाजी उद्ममनगर परिसरात दुचाकीवरुन गुटखा घेऊन जाणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील सुमारे ६० हजारांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईत दोन दुचाकी व दोन मोबाईल असा सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सखाराम सावंत (रा. माळी कॉलनी, राजारामपुरी) व संतोष कुंभार (रा. कळंबा) या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सखाराम सावंत आणि संतोष कुंभार हे बेकायदेशीर गुटखा वाहतूक करतात, अशी माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने शिवाजी उद्यमनगरात सापळा रचला. सायंकाळी हे दोघेही दुचाकीवरून जाताना पोलिसांना दिसले. यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पिशव्यांची तपासणी केली असता, त्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६० हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ तसेच दोन दुचाकी आणि २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Gutka worth Rs 60,000 seized in Udyamnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.