दत्तवाडमध्ये गुटखा विक्री जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:12+5:302021-07-07T04:31:12+5:30

दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) परिसरात कर्नाटकातून आणून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. पोलीस व अन्न व औषध ...

Gutkha sales in full swing in Dattawad | दत्तवाडमध्ये गुटखा विक्री जोमात

दत्तवाडमध्ये गुटखा विक्री जोमात

Next

दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) परिसरात कर्नाटकातून आणून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. पोलीस व अन्न व औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे यावर कारवाई करणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कर्नाटक सीमाभागातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला गुटखा आणला जात आहे. सीमाभागातील बोरगाव, सदलगा, एकसंबा येथून कोरोना काळात लॉकडाऊन असतानाही मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक सुरू आहे. गावातील गांधी चौक, दसरा चौक, दवाखाना चौक याठिकाणी राजरोसपणे गुटखा विक्री केली जात आहे. कर्नाटकातून गुटखा वाहतूक करणा-या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. गावातील व्यापा-यांना गुटखा पोहोच करण्याचे काम या टोळीतील युवकांकडून सुरू आहे.

यापूर्वी पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई करून गुटखा पकडला आहे. पण पोलीस कारवाईनंतरही गुटखा विक्री होत असून पोलीस व अन्न व औषध प्रशासन यांनी धडक मोहीम करून प्रतिबंधित गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Gutkha sales in full swing in Dattawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.