२७ कोटीची फसवणूक: 'मेकर'च्या मुख्य एजंटला मुंबई विमानतळावर ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 01:10 PM2022-10-20T13:10:24+5:302022-10-20T13:12:56+5:30
मेकर ॲग्रो इस्टेट कंपनीने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून प्रसिद्धी मिळवली होती. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांची सुरक्षितता म्हणून अनेक ठिकाणच्या जमिनी लिहून दिल्या.
कोल्हापूर : मेकर ग्रुप इंडिया कंपनीतील २७ कोटी ४५ लाख ४७ हजारांच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य एजंट ज्ञानदेव बाळासाहेब कुरुंदवाडे (रा. चावरे, ता. हातकणंगले) हा कॅनडाला गेला होता. तो ३० सप्टेंबरला भारतात परतल्याने त्याला मुंबई विमानतळावर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.
मेकर ॲग्रो इस्टेट कंपनीने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून प्रसिद्धी मिळवली होती. त्यातून अनेक एजंटही जिल्ह्यात नेमले होते. या तयार केले. एजंटांमार्फत अनेक गुंतवणूकदारही त्यात संशयित कुरुंदवाडेनेही जास्त जास्तीत गुंतवणूक करावी, यासाठी सभा, बैठका घेतल्या. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांची सुरक्षितता म्हणून अनेक ठिकाणच्या जमिनी लिहून दिल्या. यादरम्यान तो तात्पुरता जामीन मिळवून दिल्लीतून कॅनडाला गेला होता.
याबाबतची माहिती अर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यांनी पत्रव्यवहार करून त्याची माहिती मिळवली. संशयित ३० सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. त्याला तेथेच अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मुळात मेकर कंपनीकडून ५६ कोटी ४४ लाख ५२ हजारांचा अपहार झाल्याचे फिर्यादी संजय दुर्गे यांनी म्हटले होते. पण प्रत्यक्षात तपासात हा अपहार २७ कोटी ४५ लाख असल्याचे पुढे आले.